निपाणी (वार्ता) : कणगला येथे नरसिंह, सरस्वती यांची जयंती निमित्त विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी श्रीमंत दादाराजे निपाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अरविंद कमते यांनी स्वागत केले. तवनाप्पा कमते दांपत्यासह ग्रामस्थांच्या हस्ते पूजा झाली. श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते नृसिंह, सरस्वती प्रतिमेचे पूजन करून महाआरती झाली. निपाणी संस्थानचे संस्थापक श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पालखीत श्रींची मूर्ती ठेऊन मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर सुंठवडा वाटप करण्यात आला.
उमेश हिरेमठ यांनी पौरोहित्य केले. श्रीमंत दादाराजे निपाणकर यांचा ग्रामस्थातर्फे सत्कार झाला.
कार्यक्रमास राजेंद्र कमते, कमते गुरुजी, श्रीधर कमते,
बाळासाहेब कमते, जीनराज कमते, बंडू कमते, आदित्य कमते, सुदर्शन कमते, नेमीराज कमते, सुनील तेली, दत्ता खाडे, श्रेणीक कमते, महावीर पाटील, श्रीपाल कमते, श्रीकांत जडगे, मारुती खवणे, दयानंद हिरेमठ, प्रथमेश हिरेकोडी, बाळाबाई कमते, सोनाली जडगे, सुगंधा चव्हाण, छबाबाई कमते, अंजना कमते यांच्यासह महिला उपस्थित होत्या.