
दिल्ली येथे आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध
निपाणी : पाकिस्तान हा निर्माण झाल्यापासून आपल्या देशावर सतत आतंकवाद्यांच्या माध्यामापासून कुरघोडी करत आहे. या आतंकवाद्याचे हृदय परिवर्तन कधीच होणार नाही. या आतंकवादीची पाळ मूळ जगाच्या नकाशावरून पुसून टाकावेच लागेल, तरच देशातील नागरिक सुरक्षित राहू शकतील.
आजच्या तरुणांनी केवळ सामाजिक माध्यमांद्वारे पोस्ट टाकण्याएवढेच सिमीत न रहाता देशाच्या रक्षासाठी आणि सेवेसाठी तत्पर राहिले पाहिजे, असे मत श्रीविरुपाक्षलिंग समाधी मठाचे मठाधिपती प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी व्यक्त केले.
दिल्ली येथे कारमध्ये बॉम्ब ब्लास्ट करून आतंकवादी हल्लात निष्पा भारतीयांचा बळी घेणाऱ्या आतंकवाद्यांचा बुधवारी 12नोहेंबर रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक (बस स्टॅन्ड). निपाणी येथे निषेध करण्यात आला आणि या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि दहशतवादी च्या निषेध चा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते.या आंदोलनासाठी प.पू प्राणलिंग स्वामीजी श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ निपाणी आणि प.पू. नर्मदाआई श्री दत्तपीठ मठ कणंगला यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी प.पू.प्राणलिंग स्वामीजी म्हणाले
तरुणांनी फक्त मोबाईलवर डीपी, वॉट्सवर टेट्स, आणि फेसबुकवर पोस्ट टाकून देश भक्ती न दाखवता शहरात,गावागावात,गल्ली-गाल्लीत अशा आतंकवाद्यापासून सजग राहिले पाहिजे पूर्वी बाहेरच्या देशातून आतंकवादी भारतात हल्ला करत असे पण आता देशातीलच गद्दार आतंकवादी वेगवेगळ्या माध्यमातून देशावर हल्ला करत आहे आपण बातमीच्या माध्यमातून पाहतच आहोत की हे दहशतवादी उच्च शिक्षित असून त्यांच्या शिक्षणाचा उपयोग देश वीघातक कारवाई साठी करत आहे असे आतंकवादांच्या ठिकाणे किंवा अड्डे कुठे ही काहीही संशयास्पद आढळल्यास जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क करून याची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली पाहिजे तसेच राष्ट्रभक्त संघटना ही दिली पाहिजे हे आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.देशाच्या सीमेवर जवान आणि देशांच्या आत पोलिस आपल्या जिवाची बाजी लावून काम करतात म्हणून आम्ही येथे सुरक्षित आहोत याची जाण प्रत्येक भारतीयाने ठेवली पाहिजे. देशावर आघात झाल्यावर ते फक्त दोन चार दिवस दुख न दाखवता प्रत्येक दिवसाची जाण ठेवली पाहिजे. या दहशतवादी आतंकवाद्यांचा बदला घेण्याची जिद्द मनात ठेवून प्रत्येक तरुणाने भारतीय सेनेत किंवा पोलिस प्रशासन मध्ये सहभागी झाले पाहिजे किंवा राष्ट्रभक्त संघटनेत सहभागी होण्याचे असे आव्हान श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प. पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी यावेळी केले. यावेळी मावळा ग्रुपचे उदय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी आतंकवादी हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेला नागरिकांना श्रद्धांजली वाहन आली तसेच आतंकवाद्यांचा निषेध, पाकिस्तानचा निषेध, आतंकवाद्यांना चौकात फाशी देण्याची मागणी करण्यातआली तसेच ‘भारत माता की जय’, ‘वन्दे मातरम्’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनाचे सूत्रसंचालन श्री. सागर श्रीखंडे यांनी केले. या आंदोलन मावळा ग्रुपचे प्रमुख आकाश माने, राहुल सडोलकर
विश्व हिंदू परिषदचे, सुरेश भानसे, अभिजात सादळकर,बजरंग दलाचे युवराज पाटील, नंदेश सद्लगे,अजित सादळकर,गोरक्षण सेवा समितीचे, अनिकेत फडतरे श्री राम सेना निपाणी तालुक्या उपाध्यक बबन निर्मले, अभिमन्यू भालुगडे,शेतकरी विद्यार्थी संघटनाचे,प्रतीक पळगे,प्रमोद पाटील,सतीश पोमई, हिंदू हेल्प लाईनसह विविध सामाजिक संघटना सोबत चव्हाण सर ,सुशांत कांबळे,अनिल चौगुले ,हेमंत चव्हाण,आकाश चव्हाण,राहुल पाटील,शांतिनाथ मुदकुडे, कृष्णात देवगुळ, दीपक भोपळे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येत आंदोलनात उपस्थित होते!*
Belgaum Varta Belgaum Varta