
निपाणी (वार्ता) : आमदार शशिकला जोल्ले यांनी बोरगाव येथील चर्मकार समाजातील संत रोहिदास मंदिर बाबू जगजीवन राम भवन जिर्णोध्दरासाठी ५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा प्रारंभ हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. प्रारंभी समाजातील जेष्ठ नागरिक व महिलांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
समाजाचे अध्यक्ष बाळू महाजन यांनी स्वागत तर संजय महाजन यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक शरद जंगटे यांनी, शहरातील मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी आमदार शशिकला जोल्ले यांनी कोट्यावधी रुपयांचे अनुदान दिले आहे. प्रत्येक समाजाला भवन, मंदिर जीर्णोद्वारासाठी अनुदान दिले आहे. संत रोहिदास मंदिर जिर्णोदरासाठी ५ लाखांचा निधी उपलब्ध केला असून लवकरच काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले.
माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी. के. महाजन यांनी, बोरगाव शहरातील चर्मकार समाजासाठी बाबू जगजीवनराम भवन यासह संत रोहिदास मंदिर जिर्णोद्वारासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने जोल्ले दांपत्यामुळे चर्मकार समाजाचा विकास झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमास भूपाल महाजन, सचिन महाजन, उत्तम महाजन, रमेश महाजन, उदय महाजन, भरत महाजन, महांतेश महाजन, आकाश पाखरे, सुभाष महाजन, राम सातपुते, पिंटू सातपुते, लता महाजन, स्मिता महाजन, विद्या महाजन, माजी नगरसेवक उत्तम कदम, अजित तेरदाळे, फिरोज अपराज, बबन रेंदाळे, भरत पाटील, बाहुबली पाटील, ऋषिकेश गुरव यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta