मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी : निपाणीत अभियंता दिन
निपाणी : शिक्षकांमुळे समाजाची प्रगती, पोलिसांमुळे शांतता, सुव्यवस्था राखली जाते. त्यापाठोपाठ रस्ते, घरबांधणी चांगली होण्यासाठी दळणवळण सुरळीत करण्यासाठी अभियंत्यांनी कार्य केले आहेत. त्यांच्यामुळेच जलाशये, पूल अशी महत्त्वाची कामे होत आहेत देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचे योगदान महत्वाचे आहे, असे मत मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी व्यक्त केले.
येथील असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्टतर्फे येथील आराम मंगल कार्यालयात बुधवारी आयोजित अभियंता दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष श्रेयास मेहता तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर प्राधिकरणाचे शिवराज घस्ती उपस्थित होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सर विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले.
शिवराज घस्ती यांनी, घर रस्ते बांधणीसाठी पाया मजबूत असेल तरच देशाची प्रगती होत असते. हेच काम ते करत आहेत.
सर्वांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून देशाच्या प्रगतीस हातभार लावण्याचे आवाहन केले. असोसिएशनचे अध्यक्ष श्रेयास मेहता यांनी असोशियन तर्फे कोरूना काळात मोफत ऑक्षीमिटर, कोरोना योद्ध्यांना अल्पोपहार अशी विविध कामे केल्याचे सांगितले. यावेळी बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या विविध तांत्रिकबाबींबाबत स्लाईड शो दाखवून मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास असोसिएशनचे उपाध्यक्ष काकासाहेब ऐनापुरे, सेक्रेटरी आसिफ मुल्ला, खजिनदार वीरेंद्र निंबाळकर, सुरेश रायमाने, दीपक माने, अजित नरके, सोमनाथ परमने, राजशेखर हिरेकुडी, प्रमोद जाधव, अमित रामनकट्टी, उमेश खोत, अनुप पटेल, धनंजय खराडे, चंद्रकांत पाटील, अभिजीत जिरगे, विजय मेथे, योगेश घाडगे, सुजित पवार, तौसिफ बागवान, सुहास परमने, मनोज पणदे, ओमकार वरुटे, युवराज मातीवड्डर, ओम पोतदार यांच्यासह अभियंते उपस्थित होते अजय माने यांनी सूत्रसंचालन केले.
