Tuesday , March 3 2026
Breaking News

बोरगाव येथील धनगरी ढोलवादन स्पर्धेत निडगुंदी येथील ‘बेंकी बबलादी’ मंडळ सर्वोत्तम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील वाशीखान वालुग मंडळातर्फे वाशिखान मंदिरात सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धनगरी ढोल स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्रातील मंडळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत निडगुंदी येथील बेंकी बबलादी वालु मंडळांने प्रथम क्रमांक पटकावून २१ हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि शिल्ड पटकाविले.
स्पर्धेचे उद्घाटन पृथ्वीराज अभिनंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठल गावडे यांनी स्वागत केले. त्यानंतर पृथ्वीराज पाटील यांचा वाशीखान वालुग मंडळातर्फे सत्कार झाला. स्पर्धेत अब्दुललाट येथील अण्णा महाराज वालुग मंडळांनी द्वितीय क्रमांक पटकावून रोख १५ हजार एक रुपये आणि शिल्ड, तेरवाड येथील मंगराय लक्ष्मी वालुग मंडळाने तृतीय क्रमांक पटकावून रोख १० हजार रुपये आणि शिल्ड, आरग येथील लक्ष्मी वालुग मंडळाने चतुर्थ क्रमांक पटकावून रोख ७ हजार रुपये व शिल्ड आणि उचगाव येथील मंगरायसिद्ध वालुग मंडळाने पाचव्या क्रमांकाचे ५ हजार रुपये आणि शिल्ड पटकाविले. विजेत्या वालुग मंडळांना मान्यवरासह वाशीखान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले
यावेळी भरमा ऐदमाळे, राजू ऐदमाळे,रामा शिरगुप्पे, बाळू ऐदमाळे, विठ्ठल गावडे, अण्णाप्पा खोत, अनिल ऐदमाळे, कल्लाप्पा ऐदमाळे, रामा ऐदमाळे यांच्यासह वाशीखान वालुग मंडळाचे पदाधिकारी आणि संगोळी रायण्णा बॉईज मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानवी हस्तक्षेपामुळे प्राणी, वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर; सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे संस्थापक फिरोज चाऊस

Spread the love जागतिक वन्य दिन विशेष जनजागृतीसह शिकार थांबवणे गरजेचे निपाणी (वार्ता) : जैवविविधतेच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *