Thursday , March 12 2026
Breaking News

महिलामुळेच कुटुंब आणि समाजाला दिशा देण्याचे काम

Spread the love

 

शिक्षणतज्ञ पद्मा कुलकर्णी; बागेवाडी महाविद्यालयात महिला दिन

निपाणी (वार्ता) : प्रत्येक स्त्रीमध्ये अफाट सुप्त अंतरीक शक्ती असते. तिने स्वतःवरील विश्वास, आरोग्य आणि स्वप्नांना प्राधान्य देऊन या शक्तीची जाणीव ठेवण्यासह जोपासना करावी. शिवाय कुटुंब आणि समाजाला योग्य दिशा देण्याची ताकद महिलांमध्ये असल्याचे मत नाट्य कलाकार आणि शिक्षणतज्ञ पद्मा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. बेळगाव येथील के. एल. ई. संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात आयोजित महिला दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
सृष्टी डोनवाडे हिने स्वागत केले. राजश्री दिवटे हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला.
कुलकर्णी म्हणाल्या, स्त्री मानसिक दृष्ट्या सक्षम आणि लवचिक असते. ती सामाजिक अपेक्षा, आव्हाने आणि अनेक जबाबदाऱ्यांचा समतोल साधते त्यामुळेच प्रत्येक कष्टात, संकटात खचून न जाता नव्या जोमाने, जिद्दीने, कष्टाने पुन्हा उभी राहते. अशा स्त्रीची पूजा करण्याऐवजी तिला स्वातंत्र्य देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांनी आर्थिकदृष्ट्या सबळ स्त्री ही आधुनिक समाज व काळाची गरज आहे. ती केवळ कुटुंबाला स्थैर्य देत नाही तर राष्ट्र उभारणीत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास पदवीपूर्व प्राचार्या हेमा चिकमठ, महिला सक्षमीकरण अध्यक्षा बसवराजेश्वरी उळेगड्डी, आयक्यूएसी समन्वयक डॉ. अतुलकुमार कांबळे, के. एन. शंकरमूर्ती, बसवराज जनगौडा, एस. बी. पाटील, प्रा.डॉ. श्रीपती रायमाने मंजुळा नंदी यांच्यासहप्राध्यापक, विद्यार्थी उपस्थितीत होते. आर. मोनिका आणि नमिता नाईक यांनी सूत्रसंचालन केले. श्रेया दंडीनावर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव येथील अरण्यसिद्धेश्वर यात्रेनिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांची भेट

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरण्यसिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ झाला असून त्यानिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *