Tuesday , June 23 2026
Breaking News

सिदनाळ सन्मती विद्यामंदिर शाळेत दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ आहेत सन्मती विद्यामंदिर येथील सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा 42 वा सदिच्छा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी म्हणून सन्मती विद्यामंदिर शाळेचे संचालक राजू पाटील तर प्रमुख पाहुणे स्तवनिधीचे संचालक प्रदीप पाटील व संचालक महावीर पाटील हे होते.
विद्यार्थिनी विनश्री पाटील हिने स्वागत केले. त्यानंतर संस्थेचे संस्थापक गुरुदेव 108 समंतभद्र महाराजांच्या प्रतिमेसमोर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजवर्धन पाटील यांनी एन एम एम एस साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रांगोळी आणि विज्ञान, गणित वस्तू प्रदर्शनात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. आदर्श विद्यार्थी म्हणून संयम जोके व आदर्श विद्यार्थिनी म्हणून शिवानी नलवडे या दोघांचाही स्मृतीचिन्ह आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांनी झोकुन देऊन अभ्यास करावे. उत्कृष्ट गुण घेऊन आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन केले. संचालक महावीर पाटील यांनी, विद्यार्थी कसा असावा पुढील जीवन कसे जगावे असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक एम. बी कोल्हापुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास एस. बी.बेळगुद्री, पी. एम. तोटद, शितल मगदूम, यू. पी. पाटील, त्रिवेणी देसाई, श्रुती पाटील, त्रिवेणी पाटील, सुकुमार मगदूम यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. स्वरा हुक्किरे हिने सूत्रसंचालन केले. पूर्वा सुतार यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी मराठा मंडळ शिक्षण संस्थेत जागतिक योगदिना निमित्त विविध उपक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *