Thursday , March 12 2026
Breaking News

टेक्स्टाईल पार्कच्या जडणघडणीत शरद जंगटे यांचे योगदान महत्वपूर्ण

Spread the love

 

कमिशनर टी.एच.एम.कुमार; अधिकाराकडून पाहणीवेळी निष्कर्ष

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्सटाईल पार्कबाबत अफवा आणि आरोपांची शहानिशा करून बोरगाव टेक्सटाईल पार्क म्हणजे कर्नाटक राज्यातील ऊर्जित अवस्थेत असलेला आणि सर्व उद्योग धंदे विकसित अन् सुरळीत सुरू असणारा एकमेव टेक्सटाईल पार्क असून यामध्ये शंका नाही. या उर्जित अवस्थेतील उद्योग व्यवसायांच्या जडणघडणीत बोरगाव टेक्स्टाईल पार्क असोसिएशनचे अध्यक्ष शरद जंगटे यांचा मोलाचा वाटा असल्याचे मान्य लागेल, असे मत बेंगलोर येथील टेक्स्टाईल कमिशनर टी.एच.एम. कुमार यांनी व्यक्त केले.
बोरगाव औद्योगिक वसाहती मधील उद्योगधंद्याच्या जिल्हा टेक्स्टाईल अधिकाऱ्यांच्या पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना टेक्स्टाईल पार्क उद्योग व्यावसायिकाशी भेट देऊन ते बोलत होते.
राज्यातील टेक्स्टाइल उद्योग सुधारुन यंत्रमाग उद्योजकांना कारखाना उभारणीस राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्यता करता यावी,या उद्देशाने कर्नाटक सरकारच्या विविध योजनेतून मोठमोठे अनुदान दिले जात आहे. शिवाय गरजूंना सरकारी जमिनीतून गुंठेवारी प्लॉटही देऊन व्यवसायिकांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याचे काम सरकार करत आहे. पण काही ठिकाणी याचा दुरुपयोग झाला आहे. बोरगाव टेक्स्टाईल पार्क येथील सर्वच उद्योग हे शासनाच्या नियमानुसारजोमात सुरू असून राज्यातील औद्योगिक प्रकल्पापैकी बोरगाव टेक्सटाईल पार्क हे प्रथम क्रमांकाचे आणि सुस्थितीत सुरू असलेले टेक्सटाईल पार्क असल्याचे बेंगलोर टेक्स्टाईल कमिशनर टी.एच.एम. कुमार यांनी सांगून यासाठी बोरगाव टेक्स्टाईल पार्क असोसिएशनचे अध्यक्ष शरद जंगटे यांचे परिश्रम आणि योगदान असल्याचे सांगित‌ले. यासाठी असोसिएशनच्या सर्व संचालकांचे सहकार्य असल्याचे स्पष्ट केले.
बेळगावचे टेक्स्टाईल अधिकारी जयचंद पटेल म्हणाले, बोरगाव टेक्स्टाईल पार्क हे राज्यातील आदर्श आणि ऊर्जीत अवस्थेतील एकमेव औद्योगिक पार्क आहे. खोट्या अफवांना कोणीही बळी पडू नये असा इशारा दिला. सोबत टेक्स्टाईल पदाधिकारी सिदगोंडा कुंभार होते. टेक्स्टाईल उद्योजक शरद जंगटे, बी.के. महाजन, अजित तेरदाळे यांच्यासह टेक्स्टाईल असोसिएशनचे पदाधिकारी व यंत्रमाग उद्योजक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव येथील अरण्यसिद्धेश्वर यात्रेनिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांची भेट

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरण्यसिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ झाला असून त्यानिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *