Friday , March 13 2026
Breaking News

ग्रामीण भागात तंबाखू चाखीची लगबग

Spread the love

 

गुढीपाडव्याला होणार खरेदीचा मुहूर्त; प्रति किलो २०० रुपये दराची शेतकऱ्यांना अपेक्षा

निपाणी (वार्ता) : शहरासह ग्रामीण भागात तंबाखू कापणी व भरणीची कामे पूर्णत्वास आली असून सध्या तंबाखू चाकीच्या कामांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांच्या घरात सुरक्षितपणे पीक दाखल झाल्याने दिलासा मिळाला असला तरी आता सर्वांच्या नजरा बाजारभावाकडे लागल्या आहेत. यंदा उत्पादन चांगले झाल्यामुळे दरही समाधानकारक मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
गेल्या आठवड्यापासून चाकी कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. मजुरांच्या मदतीने तंबाखूची स्वच्छता करून त्याचे वर्गीकरण केले जात आहे. त्यानंतर बोदामध्ये वजन करून माल भरला जात आहे. चांगल्या प्रतीचा माल वेगळा ठेवून व्यापाऱ्यांकडे नमुने पाठवले जात आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तंबाखूची खरेदी विक्री सुरू होणार आहे. तरीही सध्या व्यापाऱ्यांकडून दराचा अंदाज घेतला जात असून अंतिम भाव जाहीर होण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. परिसरात यंदा सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावर तंबाखूची लागवड करण्यात आली होती. हंगामाच्या सुरुवातीपासूनच पिकाला पोषक वातावरण लाभले. योग्य वेळी पाऊस आणि अनुकूल हवामानामुळे पिकाची वाढ समाधानकारक झाली. परिणामी उत्पादनात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
निपाणी परिसरात अनेक दशकांपासून तंबाखूचे उत्पादन घेतले जाते. येथील काळी कसदार जमीन तंबाखू पिकासाठी पोषक मानली जाते. येथील तंबाखूची चव, मिठास आणि गुणवत्ता उच्च प्रतीची आहे कोडणी, अक्कोळ, खडकलाट, बेनाडी, नवलीहाळ या गावांप्रमाणे निपाणी परिसरातील तंबाखूलाही बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे दरही तुलनेने चांगला मिळत आला आहे. परिसरातील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अर्थकारण आजही तंबाखू पिकावर अवलंबून आहे. यंदाच्या वाढीव उत्पादनामुळे बाजारात दर स्थिर राहतील का, याबाबत काहीशी उत्सुकता आहे. मात्र चांगल्या प्रतीच्या मालाला योग्य दर मिळेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.
——————–———————————————
‘यावर्षी तंबाखू पिकाला योग्य हवामान व वेळेत पाऊस झाला आहे. त्यामुळे उत्पादन चांगले आले असून रंग आणि पत्तीही चांगली आहे. आपल्या शेतात ४९ बोध तंबाखूचे उत्पादन घेतले आहे. यंदा १८० ते २०० रुपये प्रति किलो दर मिळेल अशी अपेक्षा आहे.’
-बाळकृष्ण शिंदे, तंबाखू उत्पादक शेतकरी, अक्कोळ

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव येथील अरण्यसिद्धेश्वर यात्रेनिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांची भेट

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरण्यसिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ झाला असून त्यानिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *