
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कर्नाटक दलित संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त प्रा. बी. कृष्णाप्पा स्थापित कर्नाटक दलित संघर्ष समिती राज्यध्यक्ष गुरूमुर्ती, राज्य उपाध्यक्ष रमेश मादर, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष सुभाष सनदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवारी (ता.१४) सकाळी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून सायंकाळी शहरात निघणाऱ्या मिरवणुकीच्या वेळी उपस्थित भीमसैनिकांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
बुधवारी (ता.१५) सकाळी १० वाजता महात्मा गांधी रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप, गुरुवारी (ता.१६) ज्येष्ठ व गरजू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवारी (ता.१७) शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. रविवारी (ता.१९) गळतगा येथे प्रा. सुकुमार कांबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केले आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष दीपक केंगारे, उपाध्यक्ष रामकृष्ण माळगे, राहुल माने, पांडुरंग कांबळे, जुगनू सकट, अमोल कांबळे, संतोष भंडारे, विकास घस्ते, सुदर्शन हावडे, प्रज्वल कांबळे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta