Sunday , September 20 2026
Breaking News

धार- पवार समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील

Spread the love

 

सागर पाटील ; निपाणीत समाजाची बैठक

निपाणी (वार्ता) : अनेक समाजाची मंडळी एकत्रीत येवून समाजाचा विकास साधत आहेत. अशा परिस्थितीमध्ये धार-पवार परिवार विकासात मागे पडत होता. त्यामुळे १३ वर्षापूर्वी श्रीमंतराजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना केली. त्या माध्यमातून ५ लाख धार-परिवाराला एकत्रीत करून त्यांचे जीवन उज्वल करण्याचे काम हाती घेतल्याचे महाराष्ट्र राज्य धार-पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर पवार यांनी दिली.
निपाणी सीमा भागातील धारपवार परिवारातील बंधू-भगिनींच्या एकत्रीकरणासठी वाल्मिकी भवनमध्ये आयोजित बैठक व परिचय मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे माजी महापौर मंगेश पवार, श्रीमंत दादाराजे देसाई-निंबाळकर सरकार, कोल्हापूर शिवसेना उपनेते संजय पवार, डॉ. भालचंद्र पवार, गोविंद पवार, दिशंभर पवार, विलास पवार, विश्वासराव पवार, भिमराव पवार, आण्णासो पवार, पुरातन आणि शास्त्र शत्र संग्रह व अभ्यासक अमरसिंह पाटील-धारपवार पस्थित होते.
उमेश वैद्य म्हणाले, धार पवार घराण्याला मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू म्हणून या घराण्याचा इतिहास आहे. – छत्रपती शिवाजी महाराजांच्यामोहिमेत पवारांनी पराक्रमांनी मोहिम फत्ते केली आहे. महाराष्ट्रातील ९६ कुळी क्षत्रिय मराठा घराणे हे प्राचीन क्षत्रिय राजघराण्याचे वंशज आहेत. त्यामध्ये पवार घराणे हे एक मुख्य कुळी म्हणुन गणले जात असल्याचे सांगितले. यावेळी कोल्हापूर शिवसेना उपनेते संजय पवार यांनी धार पवार घराण्याला एकत्रीत करण्याचे मोठे काम सागर पवार यांनी केले असून या कार्यात आपण येथून पुढे अग्रेसर राहू असे सांगितले. डॉ. भालचंद्र पवार, मंगेश पवार, राजेश पवार, भिमराव पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास विलास पवार, नेताजी पवार, शहाजी पवार, जयंत पवार, सचिन पवार, जयंत पवार, ओकार पवार, सुनिल पवार यांच्यासह निपाणी सीमाभागातील शेकडो धार-पवार घराण्यातील महिला, युवक, युवती उपस्थित होत्या. डी. के. पवार यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *