Monday , April 13 2026
Breaking News

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बेनाडीत मंगळवारी मोफत दुचाकी पंक्चर सेवा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त, मंगळवारी (ता. १४) बेनाडी ते हुपरी, व बेनाडी ते निपाणी या मार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची दुचाकी पंक्चर झाल्यास अशा वाहनांचे मोफत पंक्चर काढून देण्याची सेवा करण्यात आली आहे. पांडुरंग मधाळे यांच्या सहकार्याने श्री सिद्धेश्वर अलायमेंट व, बॅलन्सिंग, सेंटर ते कुन्नूर मुख्य रस्ता, या ठिकाणी अनिल माळी, प्रज्योत माळी, शुभम माळी. यांच्या सहकार्याने सकाळपासून सायंकाळी ७ पर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. या ठिकाणी बेनाडी ते हुपरी या मार्गावरील दोन चाकी गाड्या पंक्चर झाल्यास वाहनधारकांनी या ठिकाणी मोफत सेवेचा लाभ घ्यावा.. गेली चार वर्षे ही सेवा सतत चालू असून हे पाचवे वर्ष आहे. आतापर्यंत या सेवेचा लाभ शेकडो वाहनधारकांनी, घेतला असून यावर्षीही या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

धार- पवार समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील

Spread the love  सागर पाटील ; निपाणीत समाजाची बैठक निपाणी (वार्ता) : अनेक समाजाची मंडळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *