Saturday , June 15 2024
Breaking News

चोरी करण्यासाठी आले अन् स्वतःची गाडी सोडून गेले!

Spread the love
निपाणी चोरट्यांचा प्रताप : विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे टाळला अनर्थ
निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. गुरुवारी (ता.१७) पहाटे तीन ते चार या वेळेत प्रगतीनगरमध्ये दोन ठिकाणी सराईत चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला. दरम्यान  विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. यावेळी पोलिसांना वेळीच पाचारण करण्यात आले. चोरट्यांनी घटनास्थळीच आपली दुचाकी सोडून पळ काढला. मात्र चोरट्यांनी जाता जाता आंदोलन नगरमधील आकाश पाटील यांच्या मालकीची दारात उभी केलेली दुचाकी लांबवली. दरम्यान चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून पोलिसांनी ताब्यात मिळालेल्या दुचाकीसह हत्यार व अन्य साहित्याच्या आधारे चोरट्यांचा कसून तपास चालवला आहे. पहाटेच्या दरम्यान या घडलेल्या प्रकारामुळे शहर आणि उपनगरात भीतीचे सावट पसरले आहे.
प्रगतीनगर येथील दिवंगत डॉ. प्रशांत चिकोर्डे यांचे हॉस्पिटल असून डॉ. प्रमोद निळेकर या ठिकाणी काम करतात. डॉ. चिकोर्डे यांच्या दुमजली घराच्या तळमजल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटे आतमध्ये प्रवेश करीत होते. यावेळी घरासमोर असलेल्या दुमजली इमारतीमध्ये अभ्यास करण्यासाठी बसलेल्या विद्यार्थ्याच्या ही बाब लक्षात आली. त्याने याची माहिती तातडीने डॉ. निळेकर यांना दिली. डॉ. निळेकर यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना कळविले. पोलीस घटनास्थळी येताच चोरट्यांनी तिजोरी उघडण्यासाठी लागणारी कटावणी, दुचाकी इतर साहित्य, चप्पल तेथेच टाकून पळ काढला.
यावेळी पोलिसांनी त्यांचा बऱ्याच अंतरापर्यंत पाठलाग केला. मात्र चोरटे पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरले. दरम्यान याच परिसरातील अविनाश दिवाकर यांच्या तीन मजली अपार्टमेंटमध्ये चोरट्यानी प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. यावेळी चोरट्यांनी या अपार्टमेंटमध्ये राहात असलेल्या सहा जणांच्या फ्लॅटचे दरवाजे ठोठावले. तसेच समोर राहत असलेल्या माजी नगरसेवक राजेंद्र बेळसकर यांच्या दरवाज्याच्या बाहेर लावण्यात आलेले कापडी पडदे लांबवून पोबारा केला. केवळ विचार त्यांनी या घटनेची माहिती दिल्याने मोठा अनर्थ टाळला आहे त्यामुळे पोलिसांनी शहर आणि उपनगरात गस्त वाढविण्याची मागणी नागरिकातून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान नुकसान झाले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *