
अनोख्या उपक्रमाचे कौतुक : विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन
निपाणी : येथील श्रीनगरमधील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांनी ‘चला करुया दुर्गुणांची होळी’ हा अनोखा उपक्रम शाळेत राबवल्याने दुर्गुणांची होळी पेटली. या जळत्या होळीत विद्यार्थ्याना न आवडणारी, स्वत:मध्ये असलेल्या दुर्गुणांना एका चिठ्ठीवर लिहुन होळीत टाकली. प्राचार्या चेतना चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी आपल्या जवळील दुर्गुण सोडून देण्याचा संकल्प केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात होळी पेटवली.
प्राचार्या चेतना चौगुले यांनी, होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी, अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे, अशी अपेक्षा असते. होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करत असलेली बाब खेदजनक असल्याचे सांगितले. यावेळी अमर चौगुले, संदीप हरेल, ज्योती चवई, पूजा वसेदार, निकिता ऐवाळे, रेणुका गवळी, स्वाती पठाडे यांच्यासह शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.