निकु पाटील : दौलतराव पाटील फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिर
निपाणी (वार्ता) : कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षापासून सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत होता. मात्र सध्या हा संसर्ग कमी झाला असला तरीही अनेक रक्तदाते भीतीपोटी रक्तदानासाठी तयार नाहीत त्यामुळे अलीकडच्या काळात सर्वच रक्तपेढीमध्ये रक्कमेचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन आणि निपाणी जायंट्स ग्रुप तर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून भविष्यात समाजाला रक्तदानाची गरज आहे, असे मत फाऊंडेशनचे संस्थापक निकु पाटील यांनी व्यक्त केले.
दौलत नगर येथील दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन व जायंट्स ग्रुप ऑफ निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने तुकाराम बीज निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबीरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. महादेव बन्ने यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी रक्तदात्यांना फाऊंडेशनचे संस्थापक संयोगित उर्फ निकु पाटील व जायंट्सचे अध्यक्ष गंगाधर मगदुम यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष वसंत धारव, जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापुरचे अध्यक्ष सुरेश घाटगे, रोटरी क्लबचे अध्यक्ष सोमनाथ परमणे, आनंद सोलापूरकर, माजी नगरसेवक दिलीप पठाडे
स्वप्नील पावले, रमेश भोईटे, मनोहर कापसे, नारायण यादव, आकाश मल्लाडे, रणजीत मगदूम, हिमांशू पाटील, विक्रांत पावले, विक्रांत पोवार, सागर पाटील, पंकज पाटील, पुंडलीक कुंभार, महादेव मल्लाडे, नितीन उपाळे, राजू पाटील, चंद्रकांत पावले यांच्यासह फाऊंडेशन, हेल्थ क्लब व जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते. बबन निर्मले यांनी आभार मानले.
