Saturday , June 15 2024
Breaking News

अमलझरी येथे क्रिकेट स्पर्धा उत्साहात

Spread the love


इंडियन ग्रुपने पटकावले प्रथम क्रमांक
निपाणी : आज रंगपंचमी निमित्त निपाणी जवळील अमलझरी गावात कुमार कंकणवाडे व सागर मोरे यांनी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचं नियोजन केले होते. त्यामध्ये इंडियन ग्रुपनी प्रथम क्रमांक, बाल गणेश मंडळाने द्वितीय क्रमांक तर एचटीएम बॉईजने तृतीय क्रमांक पटकावला.


प्रस्ताविक व्यक्त करतांना कुमार कंकणवाडे म्हणाले, या क्रिकेट स्पर्धेत गावातील सर्व खेळाडूंनी चांगल्या पद्धतीने खेळ खेळून मैदान गाजविले व प्रेमाने आपुलकीने खेळ खेळून सर्वांची मने जिंकली. यापुढेही आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्यास मोठ्या रक्कमेची बक्षिसे ठेऊन स्पर्धा ठेऊ असे सांगितले. रात्री 8 वा. श्री दत्त मंदिर येथे श्री. सचिन शशिकांत कौंदाडे यांच्या शुभ हस्ते बक्षिस देऊन तिन्ही संघांना गौरविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्व खेळाडूंचे आभार सागर मोरे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान नुकसान झाले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *