निपाणी परिसरातील विविध केंद्रांवर लस : लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी
निपाणी : जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या महालसीकरण मोहिमेत निपाणी शहरासह अकोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या ममदापूर (के. एल. ) अकोळ, पडलिहाळ, जत्राट, लखनापूर, कोडणी आदी गावांमध्ये दिवसभरात पाच हजारांवर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यासाठी जिल्ह्यात सुमारे बाराशेहून अधिक केंद्रे निर्माण करण्यात आली होती.
महालसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रे, समुदाय भवन, सरकारी व खासगी हॉस्पिटल्स, विविध सामाजिक संस्था, समाजसेवी संघटना, खासगी डॉक्टर्स यांची मदत घेण्यात आली होती. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुमारे 5 हजार नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. डॉ. शीतल कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अकोळ, डॉ. संजय पंतबाळेकुंद्री, डॉ. हर्षल जाधव यांनी एका दिवसात अकोळ येथे 950 लोकांना लस दिली. दिव्यांग तसेच वृद्धांना घरी जाऊन लस देण्यात आली. लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या उपक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले. ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, परिचारिका यांनी लसीकणासाठी परिश्रम घेतले. निपाणीचे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे तसेच तलाठी व पीडीओंनी लसीकरण केंद्रांना भेटी दऊन पाहणी केली.
Check Also
ऊस, सोयाबीन दरासह शेतकऱ्यांच्या समस्यांबबाबत सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा
Spread the love निपाणी (वार्ता) : माजी मंत्री व विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी …