विरुपाक्षलिंग समाधी मठाचा उपक्रम : खबरदारी घेण्याचे आवाहन
निपाणी : शहर आणि परिसरातील भक्तांनी यमगरणी येथे नदीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन केले होते. त्यातील अनेक गणेश मूर्ती पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे बाहेर पडल्या होत्या. याची दखल घेऊन येथील श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प्राणलिंग स्वामींनी मठाचे कार्यकर्तेच्या सोबत चर्चा केली. त्यानंतर रविवारी सकाळी स्वत: प्राणलिंग स्वामी आणी श्री गणेश भक्तांनी या सर्व मूर्तीचे विटंबना होवू नये, त्यासाठी पाण्याबाहेरील सर्व गणेश मूर्ती विधीवत पूजन करून परत नदीच्या मध्यभागी विसर्जन केल्या.
यावेळी प्राणलिंग स्वामी यांच्या हस्ते सामुहिक आरती व पूजा झाली. यमगरणी व सौंदलगा नदीच्या काठावर सुमारे 400 हून अधिक श्रीगणेश मूर्ती वेदगंगा नदीच्या पाण्याबाहेर होत्या. या सर्व मुर्त्या कार्यकर्त्यांनी नदीपात्रात तर्फा लावून मध्यभागी विसर्जन करण्यात आल्या.
यावेळी स्वामींनी, ज्या प्रकारे आपण 5 दिवस गणपतीची भक्ती भावाने पूजन करतो. त्याच भक्तीभावाने विसर्जनही करतो. पण विसर्जनानंतर आपली जबाबदारी संपत नाही. तर ती योग्य पध्दतीने विसर्जन झाले आहे का, हे पहाणे महत्वाचे आहे.
तसच गणेश मूर्तीची उंची ही धर्मशास्त्रनुसार असावी. खुप मोठी नसावी. गणेश मूर्ती शाडु, मातीच्या असणे आवश्यक आहे. प्लास्टर ऑफ पॅरीसची श्रीची मूर्तीचे विसर्जन होत नाही. शिवाय पर्यावरणालाही घातक असते. त्यामुळे भक्तीसोबत पर्यावरणाचाही समतोल राखणे ही आपली जबाबदारी आहे. नदी शेजारच्या गावामधील सर्व तरूण मंडळ आणि गावातील तरुणांनी पुढाकार घेवून वेदगंगानदी शेजार्यांच्या गावातील सर्वांनी ज्या गणेश मूर्ती पाण्याबाहेर आहेत. त्याचे विटंबना होवू नये, म्हणून सर्वांनी एकत्र येऊन त्या तत्परतेने सोडव्यात. पुढच्या वर्षी अशा पध्दतीचे विसर्जन होवू नये, याची काळजी घेण्याचे आवाहनही स्वामींनी केले.
