Wednesday , May 29 2024
Breaking News

पेरणीपूर्व मशागतीसाठी बळीराजाची धांदल

Spread the love

कोगनोळी परिसरात बैलजोडीचा तुटवडा
कोगनोळी : यंदा मान्सून वेळेवर दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्यामुळे कोगनोळीसह परिसरात खरीप पूर्व शेतीकामांना वेग आला आहे. रणरणत्या उन्हातही शेती मशागतीच्या कामासाठी शेतकर्‍यांची धांदल सुरु आहे. यातच बैलजोडीचा तुटवडा जाणवत असल्याने ट्रॅक्टरने मशागत करण्यावर शेतकर्‍यांचा भर आहे.
गतवर्षी अतिपावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा खरिपात तरी निसर्ग साथ देईल आणि शेतीतून काही तरी उत्पन्न हाती येईल या आशेने शेतकरी मशागतीत व्यस्त झाल्याचे चित्र आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राचा पाऊस सुरु झाल्यानंतर पेरण्या सुरु होतात. बैलजोडीद्वारे शेतकरी शेतात मशागत करतात. बैलजोडी नाहीत त्यांना बैलजोडीचा शोध घ्यावा लागतो आहे. ट्रॅक्टर सहजच उपलब्ध होत असून वेळेची बचत होते. शेतीची नांगरणी खोलवर होते. त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे मशागतीकडे कल वाढला आहे. बैलजोडीच्या साहाय्याने मशागत न करता आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याला जोर आहे. डिझेलचा दर वाढल्याने नांगरटीचा दरही वाढला आहे.

शेतकर्‍यांकडून शेणखताचा वापर
रासायनिक खते आणि वारंवार पाणी दिल्याने जमिनीचा पोत कमी झाला आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांऐवजी शेणखत शेतात टाकत आहेत. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होत आहे. शेणखताचे दरही भरमसाठ वाढले आहेत. ही कामे जोरदारपणे सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

अवकाळीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाऊन लाखाची मदत

Spread the love  निपाणी (वार्ता) : अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे निपाणी परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *