Wednesday , July 24 2024
Breaking News

कोगनोळी परिसरात वटपौर्णिमा सोहळा उत्साहात संपन्न

Spread the love

कोगनोळी : कोगनोळी परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी आदी भागात सात जन्मी हाच पती मिळू दे असे म्हणत वडाच्या झाडाची पूजा करत महिलांनी परिसरात वटपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने व उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरी केले.
यावेळी सुवासिनींनी आपले व आपल्या पतीचे दिर्घआयुष्यासाठी व सातजन्मच्या प्राप्तीसाठी हिंदू धर्मातील स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची मनोभावे पूजा करतात.
मंगळवार तारीख 14 रोजी परिसरात वटपौर्णिमे दिवशी वडाची पूजा करण्यासाठी सुवासिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सुवासिनींनी मला व माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभुदे म्हणून वडाला सुती धागा गुंडाळून फेर्‍या मारून मनोभावे पूजा केली. अखंड आयुष्य लाभू दे असा आशीर्वाद घेतला.
पाच प्रकारची फळे भेट देऊन एकमेकींना शुभेच्छा दिल्या. यावेळी नववधू व सुहासनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सुहासिनी महिलांनी दिवसभर उपवास धरला आहे. सदर उपवासाची सांगता दुसर्‍यादिवशी होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

नूतन मराठी विद्यालयात रंगला रिंगण सोहळा

Spread the love  विद्यार्थ्यांनी केल्या विविध वेशभूषा : शहरातून पालखी मिरवणूक निपाणी (वार्ता) : येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *