इस्माईल पटेल : निपाणी रोटरी, इनरव्हीलचा पदग्रहण सोहळा
निपाणी : रोटरी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था समाजासाठी निरंतरपणे कार्यरत आहे. समाजसेवा हेच या संस्थेचे ध्येय आहे. आयुष्यात अनेक अडचणी येत असतात त्यांचा सामना करत निश्चित ध्येय गाठणे आवश्यक आहे. याबरोबरच आपल्या अंगातील चांगले गुण आणि सवयी हेरून त्याचा समाजासाठी वापर करावा, असे आवाहन माजी सातारा येथील रोटरी जिल्हा प्रांतपाल इस्माईल पटेल यांनी केले.
निपाणी रोटरी आणि इनरव्हिल क्लबचा पदग्रहण सोहळा सोशल डिस्टन्सनुसार येथील रोटरी हॉलमध्ये झाला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी बेळगाव जिल्हा रोटरीचे माजी सहाय्यक प्रांतपाल विक्रम जैन, मदिना पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी व्यासपिठावर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर रोटरी क्लब अध्यक्ष म्हणून सोमनाथ परमने सेक्रेटरी म्हणून विनय जैस्वाल, खजिनदार म्हणून गजेंद्र तारळे यांचा पटेल यांच्या हस्ते पदग्रहण सोहळा झाला. रोटरी क्लब उपाध्यक्ष अमर बागेवाडी, सुजय शहा, कम्युनिटी सर्विस संचालक सुहास परमणे, क्लास सर्व्हिस संचालक सुबोध शहा, युथ सर्विस संचालक सचिन देशमाने, इंटरनॅशनल सर्विस संचालक राजेश पाटील, व्होकेशनल सर्विस संचालक आनंद सोलापूरकर, मेंबरशिप डिलिव्हरी कमिटी चेअरमन वैशाली पाटील, पल्स पोलिओ कमिटीचे चेअरमन श्रेनिक मेहता यांनीही पदभार स्वीकारला.
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा जयश्री गुदगन्नावर, सेक्रेटरी गजाला पठाण, खजिनदार स्नेहल परमणे यांनी मदीना पटेल यांच्या हस्ते पदभार स्वीकारला.
नूतन अध्यक्ष सोमनाथ परमने यांनी, रोटरीच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याशिवाय वृक्षारोपण गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, पल्स पोलिओ, मोफत नेत्र चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिरे रक्तदान शिबिर असे उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. मदीना पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी रोटरी हेल्थ सेंटर अंतर्गत ऑक्सिजन कॉन्सटेटर मशीनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी, संजय नंदर्गी, चेतन लगारे, प्रमोद जाधव, डॉ. संतोष खज्जनावर, अभय मेहता, चिंतामणी वाळवे, पद्मनाभ कुलकर्णी, महांतेश हिरेकोडी, समीर कुलकर्णी ज्योतिराव जाधव, कौस्तुभ खांडके, समीर कुलकर्णी, वर्षा नंदर्गी, पुष्पा कुरबेट्टी, श्रुती शाह, लतिफा पठाण यांच्यासह रोटरी आणि इनरव्हील क्लबचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. डॉ. सुहास शहा यांनी सूत्रसंचालन केले.
Check Also
पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …