Saturday , July 20 2024
Breaking News

पर्यावरण वाचवा वसुंधरा वाचवा : दिलीप शेवाळे

Spread the love

सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा या शाखेत पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलताना न्यू सेकंडरी स्कूल भोजचे विज्ञान शिक्षक श्री. दिलीप शेवाळे सर म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने पर्यावरणाची काळजी घेणे गरजेचे आहे. ती घेतली तरच पृथ्वी व पृथ्वीतलावरील सर्वजण जगणार आहोत. जगातील बर्‍याच देशांच्यामध्ये तापमान वाढीचे संकट आहे काही देशांच्यामध्ये पाणी मिळत नाही. आपल्याकडेही पावसाचे प्रमाण निश्चित नाही या सगळ्याला कारणीभुत पर्यावरणाचा झालेला नाश आणि त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घ्यावी जल है तो कल है हे सांगताना पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची अनेक कारणे स्पष्ट केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे. एस. वाडकर हे होते.
सुरुवातीला श्री. दिलीप शेवाळे व कारदगा येथील डी. एस. नाडगे‌ हायस्कूलचे विज्ञान शिक्षक श्री. एस. टी. कुंभार यांच्या हस्ते वडाचे रोप लावून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत श्री. एसडी कुंभार यांनी केले. यावेळी नाडगे हायस्कूलचे विज्ञान शिक्षक एस. टी. कुंभार यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाची माहिती देताना प्रत्येक विद्यार्थ्यांने एक तरी झाड लावून जगवावे असे आव्हान केले. मुख्याध्यापक जे. एस. वाडकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पी. पी. भोईटे यांनी केले तर आभार एम. जी. बोरगे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

सध्या शिक्षणाला अधिक महत्त्व द्या

Spread the love  क्षमा मेहता; ‘इनरव्हील’तर्फे आनंदी शाळेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सध्या जग बदलत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *