Friday , October 25 2024
Breaking News

मोहनलाल दोशी विद्यालयाची एस.एस.सी. परीक्षेत उज्जवल निकालाची परंपरा कायम

Spread the love
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयचा एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२२चा निकाल ९८.३५टक्के लागला असून उज्ज्वल निकालाची पाच दशकांची अखंड परंपरा शाळेने यावर्षीही कायम राखली आहे
विद्यालयातून एकूण २४३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामधील १०३विद्यार्थी  विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण, तर ९६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तसेच ३५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व ५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी घेऊन यशस्वी झाले.
त्यामधील प्रणाली यशवंत सातवेकर हिने ९५.२० टक्के गुण मिळवून अर्जुननगर केंद्रात व विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला, तर पूजा राजू गुडाळे ९४ टक्के गुणासह द्वितीय, तर सानिका प्रदीप पावले हिने ९३.८० टक्के गुणासह तृतीय क्रमांक पटकावला त्याबद्दल समाज्याच्या विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  आशीषभाई शाह, उपाध्यक्षा प्रतिभाभाभी शाह, व डॉ. तृप्ती शाह यांच्यासह सर्व संचालक पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

बाळूमामा व बालाजीनगरातील प्लॉट विक्रीस बंदी

Spread the love  निपाणी : निपाणी मुरगूड रस्त्यानजीक असणाऱ्या बाळूमामा नगर व बालाजी नगर मधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *