कोगनोळी : अग्निपथ योजनेला बेळगाव येथे सोमवार तारीख 20 रोजी बंद पुकारून मोर्चा काढण्यात येणार होता.
सदर बंदला व मोर्चाला जिल्हाधिकारी व पोलिस अधिकारी यांच्याकडून परवानगी मिळाली नसल्याकारणाने बेळगावमध्ये होणारा बंद व मोर्चा मागे घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या टोल नाक्यावर महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांची पोलिसांच्याकडून तपासणी करण्यात येत आहेत.
निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कोगनोळी पोलीस स्टेशनचे एएसआय एस. आय. कंबार, राजू गोरखनावर, एम. एन. खानापन्नावर, शिवप्रसाद पोलीस यांच्यासह अन्य पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
