सौंदलगा : सौंदलगा येथे जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सौंदलगा ग्रामपंचायत मध्ये सचिव अश्पाक शेख यांनी सर्वांचे स्वागत करून आज ८ वा जागतिक योगा दिवस सौंदलगा ग्रामपंचायतीच्या वतीने साजरा करीत आहोत असे सांगितले. यानंतर प्रमोद ढेकळे यांनी सांगितले. की आहार-विहार, प्राणायाम यांचा हा व्यायाम आहे. योगा हा एक दिवस करून चालणार नाही या त्यात सातत्य राहिले पाहिजे. या नंतर उपस्थितांकडून योगा करून घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील, सुधाकर पाटील, अरुण शिंदे, दादासाहेब कोगनोळे, शरद चौगुले, सुधाकर दिंडे, बाळासाहेब कळंत्रे, वासू भानसे, नागेश कुंभार, बाबासो वाक्रुसे, मुख्याध्यापक धनंजय ढोबळे यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार ग्राम विकास अधिकारी जावेद पटेल यांनी मानले.
सौंदलगा, फोटो : ग्रामपंचायत मध्ये योगा करून योगा दिन साजरा करताना
