नगराध्यक्ष जयवंत भाटले : व्यंकटेश्वरा पीयू कॉलेजमध्ये दशकपूर्ती सोहळा
निपाणी : शिक्षण संस्था चालवत असते वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणीवर मात करत धुमाळ दाम्पत्याने संस्थेचे नाव नावारूपास आणले. या त्यांच्या कार्यास सर्वतोपरी मदत करण्यास मी नेहमी तत्पर असेन, अशी ग्वाही नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी दिली. येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री व्यंकटेश्वरा पी यू कॉलेजमध्ये दशकपूर्ती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाटले बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष चंद्रहास धुमाळ उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. एम. डी. खोत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य अलका धुमाळ व अध्यक्ष चंद्रहास धुमाळ यांचा नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्राचार्य ए. सी. धुमाळ यांनी दहा वर्षांमध्ये केलेल्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्ष चंद्रहास धुमाळ यांनी, जिद्द व चिकाटीच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते असे सांगितले.
कार्यक्रमास भाजपा शहराध्यक्ष प्रणव मानवी, संचालक विक्रमादित्य धुमाळ, माध्यमिक मुख्याध्यापक एस. एस. पचंडी, प्राथमिक मुख्याध्यापक व्ही. एम. बाचणे, यू. आर. पवार, आर. एस. चव्हाण, अश्विनी सुतार, व्ही. बी. पाटील, एस. बी. पवार, एस. आय. किवंडा, यू. वाय. आवटे, एस. आर. संकपाळ, ए. एम. कुंभार, एस. एस. कुलकर्णी, एस. के. जोशी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. पी. जगदाळे, यांनी केले. तर आभार पी. व्ही. वासिकर यांनी मानले.
