निपाणी : बेकायदा गांजा विक्री करणार्या तीन जणांना निपाणी बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित संशयित आरोपीकडून 12 हजार 120 रुपयांचा 1180 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. अर्जुन जयसिंग कांबळे (वय 23 रा.निपाणी) मलिक दस्तगीरसाब शेख रा. मोमीन गल्ली, गोकाक) आणि अरबाज इस्माईल शाबाजखान (रा. गोकाक) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत निपाणी बसवेश्वर चौक. याबाबत बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, निपाणी इचलकरंजी मार्गावरील लखनापुर ओढ्याजवळ संशयित आरोपी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना खबर्याकडून मिळाली होती. त्यानुसार मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी व सहकार्यांनी सापळा रचला होता. संशयित आरोपी गांजा विक्रीसाठी आल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून यापूर्वीचेही गांजा विक्रीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आठवड्याभरात गांजा विक्रीचे दुसरे प्रकरण उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वरील तिन्ही आरोपीच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून पुढील तपास आनंद कॅरकट्टी हे करत आहे.
