कोगनोळी : येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान व कोगनोळी गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवीचा जागर सोहळा दोन तीन दिवसावर येऊन ठेपला आहे. या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी दिली.
अंबिका मंदिर सभोवतालचा परिसर ग्रामपंचायतीकडून स्वच्छ करून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पुरुष व महिला दर्शन घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
आठ दिवस चालणार्या या नवरात्र उत्सवा निमित्त सकाळी सात वाजता, दुपारी बारा वाजता व रात्री आठ वाजता देवीची आरती होत असते. या आरतीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यावेळी गर्दी होऊ नये म्हणून मंदिर सभोवताली कोगनोळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कडून सुरक्षित अंतराचे रिंगण तयार करून घेण्यात आले आहेत. भाविक भक्तांनी आरतीसाठी या रिंगणात उभे राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन अनिल चौगुले, तुकाराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, युवराज कोळी, धनाजी पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी युवक मंडळांचे पदाधिकारी हायस्कूल शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
Check Also
यमगर्णीत सामाजिक कार्यकर्त्याचा खून
Spread the love सौरभच्या फसवणुकीचा राग; हिंडलगा कारागृहात रवानगी निपाणी(वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील …