Monday , December 4 2023

सीमाभागात रुजते गांजाशेती!

Spread the love

निपाणी, रायबाग तालुक्यातील शेतकरी : झटपट श्रीमंतीच्या मोहाला बळी
निपाणी : श्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतकरी गांजा पिकाकडे वळताना दिसत आहेत. गांजाची लागण करताना कमालीची गोपनीयता पाळली जाते.
सीमाभागातील निपाणी कागल, चिक्कोडी, रायबाग तालुक्यात अनेक गावांमध्ये ऊस, सूर्यफूल आदी पिके घेतली जातात. यामध्ये गांजा लागवड केली जात आहे.
वरील तालुक्यातील अनेक गावात विक्री करणार्‍या सह लागवड करणार्‍यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून वर्षभरात लाखो रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. आठवड्याभरात निपाणी शहर आणि बसवेश्वर चौक पोलिसांनी दोन वेळा गांजाची विक्री करताना आरोपींना गजाआड केले आहे. त्यामुळे गांजाची चोरी शेती पुन्हा चर्चेत आली आहे.
सीमाभागातील अनेक गावात ऊस, मका, तूर, सूर्यफूल या पिकांतर्गत गांजा पिकाची लागवड केली जाते. पीक परिपक्व झाल्यानंतर त्याची पाने तोडून वाळत घातले जातात. कोणत्याही प्रक्रिया न करताच गांजा तयार होतो. गांजा विरोधी कारवाई करताना महसूल खात्यातील सक्षम अधिकारी घेऊन छापा टाकण्यात बंधनकारक असताना एकाही कारवाईस महसूल अधिकार्‍याचा समावेश केला जात नाही. तसेच महसूल विभागातील तलाठी शेतात जाऊन पीक पाहणी करण्याची सूचना असताना देखील अनेक कार्यालयात बसूनच पीक-पाणी दप्तरी नोंद करताना दिसतात. महसूल विभागाचे वचक बसत नसल्यामुळे झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी गांजाची या अवैध मार्ग निवडताना दिसत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

एस. बी. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

Spread the love  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील येथील मोहनलाल दोशी विद्यालयात ३१ वर्षे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *