कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथील वृद्ध निराधार बेवारस लोकांच्यासाठी कार्यरत असलेल्या भारतीय सेवा वृद्धाश्रमास कागल पोलीस ठाण्याकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत नुकतीच देण्यात आली. यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांचा भारतीय सेवा संघ येथील निराधारांना आधार मिळाल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.
मत्तीवडे तालुका निपाणी येथील वृद्धाश्रमात सध्या दहा वृद्ध लोक राहत असून त्या लोकांना कागल पोलीस ठाण्याचे पीआय दत्तात्रय नाळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाकर पुजारी, मोहन माटुंगे, संभाजी पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी दत्तात्रय नाळे यांनी सर्व वृद्धांची आत्मीयतेने चौकशी करून वृद्धाश्रम चालविणार्या सौ. व श्री. पवार दाम्पत्यांची त्यांनी कौतुक केले.
सर्व उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचे अमर पवार यांनी आभार मानले.
Check Also
पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …