Saturday , December 14 2024
Breaking News

निपाणी तालुक्यातील लसीकरणाचा गोंधळ संपणार तरी कधी?

Spread the love

दिवसभर नागरिकांच्या रांगा : अपुर्‍या पुरवठ्याचा परिणाम
निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना साथीचा आजार व संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर भर घेण्याचे आवाहन प्रशासन करीत असले तरी प्रत्यक्ष लसीचा होणारा पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. लस घेण्यासाठी नागरिकांची होत असलेली गर्दी यामुळे मागील पंधरा दिवसापासून निपाणी शहरासह तालुक्यात प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. त्यातच मागील आठवड्यात केवळ दोन दिवस लस आली तर या आठवड्याची सुरुवातच लस उपलब्ध कोट नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे तशी करण्याचा गोंधळ कधी थांबणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या दुसर्‍या डोसमधील अंतर संपूनही उपलब्ध होत नसल्याने अंतर वाढवून 84 दिवसांचे करण्यात आले आहे. आता हे 84 दिवसही उलटून गेले तरी नागरिकांना लस मिळत नसल्याने संताप व्यक्त करत आहेत. तर तिसर्‍या लाटेपासून वाचण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील युवा वर्ग लसीकरण केंद्राबाहेर गर्दी करत आहेत. लसीचा नियमित पुरवठा झाल्यास तालुक्यात दररोज हजार लसीकरण करण्याचा प्रयत्न राहील,असे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी म्हटले असले तरी लसीकरणाचा सावळा गोंधळ संपताना दिसत नाही. 4 लाखाच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या निपाणी तालुक्यात लसीकरणासाठी 15 हून अधिक केंद्र आहेत. याठिकाणी जेव्हा लस येते तेव्हा ते प्रमाण सरासरी दीडशे ते दोनशे लस असते. तुटपुंज्या प्रमाणात लस आल्यावर ती किती लोकांना दिली जाणार हे अस्पष्ट आहे. केंद्रावर लस घेण्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून नागरिक रांगा लावत आहेत. साडेनऊनंतर केंद्र उघडताना लसीचा आकडा समजतो अथवा लस आली नाही असे सांगितले जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्य विभागाला विचारणा केली असता लसच उपलब्ध नाही अथवा लसीचा पुरवठा कमी आहे, असे सांगितले जाते. कोरोनाची तिसरी लाट रोखायची असले तर शासनस्तरावर या लसीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. सर्व केंद्रावर नियमित व पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे. सोबतच लसीकरण केंद्रावर काम करणारे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, नर्स या सर्वांना मदतच होईल. अनेक जण शासनाच्या कोविड अथवा आरोग्य सेतू अ‍ॅपवरून लसीकरणाची नोंदणी करतात. त्यानुसार लसीचा दिनांक व वेळ दिलेली असते. प्रत्यक्षात केंद्रावर गेल्यावर मात्र लस संपली आहे. ऑनलाईन नोंदणी केली असली तरी रांगेत थांबा अशी उत्तरे मिळत आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक तासंतास रांगेत ताटकाळत थांबलेले असतात. सकाळी रांग लावल्यानंतर दुपारी नंबर येतो. परिणामी उपाशीपोटी नागरिकांना लस घ्यावी लागत आहे. यामधून अनेकांना त्रास देखील होत आहे.
—-

’गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील सर्वच लसीकरण केंद्रावर लसीचा अपुरा पुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांना दिवसभर थांबून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे तरी प्रशासनाने योग्य ते नियोजन करून लसीकरण करावे.’
– दीपक सावंत, सामाजिक कार्यकर्ते, निपाणी.
—-
’पुरवठा कमी आणि नागरिकांची संख्या जास्त होत असल्याने काही लसीकरण केंद्रावर नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींना दिली आहे त्यानुसार ज्यादा लसीचा पुरवठा होताच सर्वांना लसीकरण केले जाईल.’
– डॉ. व्ही. व्ही. शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिक्कोडी.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द

Spread the love  उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *