Wednesday , May 29 2024
Breaking News

खानापूरच्या दुर्गम भागात वन टच फौंडेशनतर्फे मदत

Spread the love

खानापूर : गोरगरीब गरजू लोकांना निस्वार्थपणे मदत करण्यात अग्रेसर असलेल्या बेळगावच्या वन टच फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बेटणे, गवळीवाडा, पारवाड, गवळीवाडा या दुर्लक्षित खेडेगावांमध्ये ‘एक हात मदतीचा’ ब्रीदवाक्याला अनुसरून जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली.

जूना गुडसशेड रोड बेळगाव वन टच फौंडेशन या संस्थेच्या पुढाकारातून बेळगाव पासून 55 कि. मी. अंतरावरील जांबोटी आणि कणकुंबी (ता. खानापूर) भागातील अतिशय घनदाट जंगलात वसलेल्या बेटणे, गवळीवाडा, पारवाड व गवळीवाडा गावांमध्ये जावून जिवनावश्यक साहित्य आणि कपडे वाटप करण्यात आले. सदर मदत देण्याबरोबरच वन टचच्या पदाधिकारी व सदस्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. वन टच फौंडेशनने केलेल्या या मदतीमुळे गावकऱ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता.

परतीच्या वाटेवर वन टच फौंडेशनतर्फे आमगाव येथील 14 कुटुंबांना देखील जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. या कार्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील, संतोष गंधवाले, मनोहर बुक्याळकर, जय प्रकाश बेळगावकर, रमेश सुतार, टी. डी. पाटील, सौ. सुप्रिता शेट्टी, प्रणिता गुरव, धनश्री पाटील, संतोष डोण्यान्नावर, शांतीलाल पटेल, अरूण चौगुले आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

सदर उपक्रमासाठी उदय अष्टेकर व सौ. विश्रांती अष्टेकर (रा.वडगाव) या दानशूर व्यक्तींकडून एकूण 60 कुटुंबांना किमान 15 दिवस पुरेल, इतक आहारधान्य साहित्य वन टच फाऊंडेशन संस्थेला मदत म्हणून देण्यात आले होते. ते निस्वार्थपणे वरील गावागावांत जाऊन गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले.

वन टच फौंडेशनला दानशूर लोकांच्या सहकार्याची गरज आहे. ज्याना कुणाला या संस्थेला मदत करायची असेल त्या दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वन टच फाउंडेशन एसबीआय ए/सी नं. 37936516676, आयएफएससी कोड -एसबीआय एन 0040363. फोन पे /गुगल पे -9342307605.

About Belgaum Varta

Check Also

नियोजित वधूच्या आत्महत्येनंतर बेळगाव येथे तरुणाची आत्महत्या

Spread the love  बेळगाव : ज्या तरुणीसोबत लग्न करायचे होते तिच्या सोबतच लग्न ठरले आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *