बेळगाव : बेळगावच्या बिम्स आवारात एल अँड टी कंपनीने केवळ 21 दिवसात ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली आहे. काल शनिवारी खासदार मंगल अंगडी यांच्या हस्ते या प्लांटचे उद्घाटन झाले.या प्लॉटमधून दर मिनिटाला 700 लिटर ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. या प्लांटमधील ऑक्सिजनचा पुरवठा बिम्सला केला जाणार आहे.
कंपनीकडून सदर प्लांट बिम्सकडे रीतसर हस्तांतर करण्यात आला आहे. या प्लांटसाठी एल अँड टी कंपनीने सीएसआर निधीतून एक कोटी 10 लाख रुपये निधी खर्च केला आहे. ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक सर्व साहित्य टर्की या देशातून आयात करण्यात आले आहेत. बेळगावात ऑक्सिजन निर्मितीचे खाजगी प्लांट आहेत पण, मेडिकल ऑक्सिजन निर्मितीचा हा बेळगावातील पहिला शासकीय प्लांट ठरला आहे.
मे महिन्यात शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्या वेळी आमदार अभय पाटील व महापालिका प्रशासनाने एल अँड टी कंपनीला सीएसआर निधीतून ऑक्सिजन प्लांट निर्मितीचा प्रस्ताव दिला होता.
Check Also
युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक …