Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

युद्धात मध्यस्थी करा : बार असोसिएशनची पंतप्रधानांना विनंती

बेळगाव : रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद मिटवून तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यात तातडीची बैठक आयोजित करण्यास पुढाकार घ्यावा, अशी विनंती वजा मागणी बेळगाव बार असोसिएशनने एका निवेदनाद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे. बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. …

Read More »

सांबरा येथे 20 मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

बेळगाव : सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने होळीनिमित्त रविवार दि. 20 मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख कुस्ती महान भारत केसरी प्रवीण कुमार हरियाणा विरुध्द कुर्डुवाडी आखाड्याचा दादा मुलाणी यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार वि. मोतीबाग तालीम कोल्हापूरचा अरुण भोंगार्डे, …

Read More »

 युवा समितीच्या वतीने वडगांव येथील शाळा क्र. ३१ मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

बेळगाव : दि. १६/०३/२०२२ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत वडगांव येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्र. ३१ मध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर …

Read More »

पॅरा स्वीमर साहिल काजूकर याचा किरण जाधव यांच्याकडून गौरव

बेळगाव : राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश मिळविलेल्या जलतरणपटू साहिल काजूकर याचा विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किरण जाधव यांनी सन्मान केला. साहिल काजूकर याने नुकत्याच झालेल्या कर्नाटक स्टेट लेवल पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप या जलतरण स्पर्धेत 1 सुवर्ण आणि 2 रौप्यपदके पटकावून बेळगावचा लौकिक वाढविला आहे. पॅरा जलतरणपटू साहिल …

Read More »

स्पाईस जेटच्या वेळापत्रकात होणार बदल

बेळगाव : दिल्ली -बेळगाव -दिल्ली ही विमान सेवा येत्या 27 मार्चपासून दररोज सुरू राहणार असल्यामुळे स्पाईस जेट कंपनीने आपल्या वेळापत्रकात बदल केला आहे. नव्या वेळापत्रकानुसार स्पाईस जेटच्या दिल्ली, हैदराबाद व मुंबई फेऱ्या सुरू होणार आहेत. सध्या बेळगावमधून दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, पुणे, इंदूर, जोधपूर, तिरुपती व अहमदाबाद या शहरांना विमानसेवा …

Read More »

राजू दोड्डबोमन्नवर हत्याकांडातील आरोपी लवकरच गजाआड : पोलीस आयुक्त बोरलिंगय्या

बेळगाव : बेळगावमधील मंडोळी रोडवर बांधकाम व्यावसायिक राजू दोड्डबोमन्नवर यांच्या हत्या प्रकरणाची माहिती शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी आज दिली. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी आपल्या कार्यालयात माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मंडोळी रोडवर बेळगाव शहराच्या हद्दीत येणाऱ्या ग्रामीण पोलीस ठाण्या अंतर्गत …

Read More »

जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत यश

बेळगाव : बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 16 व्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. केएलई सोसायटी संचलित महाविद्यालयाच्या स्केटिंग रिंकवर घेण्यात आलेल्या या स्केटिंग स्पर्धेत 160 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. क्वाड स्केटिंग आणि इनलाइन स्केटिंग अशा दोन प्रकारात 500 मीटर आणि 1000 …

Read More »

स्वतःचे आरोग्य जपणे महत्वाचे : डॉ. सविता कद्दू

बेळगाव : कुद्रेमनी येथे ‘सावित्रीबाई फुले महिला मंडळ’ आणि ‘निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी समाज सेवा संस्था’ कुद्रेमनी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी-कुंकू आणि जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्री नमनाने झाली कार्यक्रमाला व्यासपीठावर अध्यक्षा सौ. लता अर्जुन जांबोटकर, प्रमुख वक्त्या डॉ. सविता कद्दू, सत्कारमूर्ती डॉ. सविता देगीनाळ, प्रमुख अतिथी …

Read More »

मराठा स्वामींना बेळगाव दौऱ्याचे आमंत्रण

बेळगाव : 15 मे रोजी बेळगाव येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या एकत्रिकरणाच्या कार्यक्रमासाठी व बेंगळोरस्थित मराठा समाजाच्या मठाचे मठाधीश म्हणून अधिग्रहण केल्याबद्दल मंजुनाथ स्वामींचा सत्कार करण्यासाठी बेळगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी बोलताना किरण जाधव म्हणाले, मराठा समाजाचे महत्वाचे अधिष्ठान बेंगळोर येथे आहे. हे सर्व समाजाला …

Read More »

ग्रामीण आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर यांना सत्तेचा माज : धनंजय जाधव

बेळगाव : गणेशपुर-सरस्वती नगर येथील श्री. रविंद्र कृष्णाजी मोहिते यांचे कोणत्याही शासकीय अथवा न्यायालयीन आदेशाविना बुल्डोझरने घर पाडण्यात आले, तसे पाहता त्या घराबाबत उच्च न्यायालयाने श्री. रविंद्र कृष्णाजी मोहिते यांच्या बाजुने निर्णय दिला आहे. तरी सुद्धा 60 फुट रस्ता निर्मितीसाठी घर पाडण्यात आले असे सांगण्यात आले. रस्ता व्हावा अशी आमची …

Read More »