बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या घरी जाऊन भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल पत्रकारांशी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, येडियुराप्पा हे आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांचे मार्गदर्शन …
Read More »LOCAL NEWS
विजापूर येथे महिलेची दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
विजापूर : मानसिक तणावातून महिलेने तिच्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील हंदिनागुर गावात घडली. 32 वर्षीय अव्वम्मा श्रीशैल गुब्बेवाड असे आत्महत्या केलेल्या या महिलेचे नाव आहे. तिने आपल्या दोन मुलींना आधी विहिरीत ढकलून देऊन स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अव्वम्मा …
Read More »पूर काळात काळात सर्व ती खबरदारी घ्या
आमदार श्रीमंत पाटील : उपाययोजनेसाठी अधिकाऱ्यांची बैठक अथणी : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे त्यामुळे अथणी कागवाड तालुक्यातील कृष्णा नदीला महापूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी पूर्व खबरदारी घ्यावी, अशी सूचना माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केली. दोन वर्षाचा अनुभव पाहता महापूर काळात प्रत्येकाने झोकून देऊन काम …
Read More »बळ्ळारी नाल्याच्या पुराने भातपीकं धोक्यात
बेळगाव : बेळगाव परिसरातील दक्षिण भाग येळ्ळूर रोडपासून सुरु होणारा बळ्ळारी नाला शेतकर्यांना तारक असलेला 2013 पासून मारकच ठरलेला आहे. यातील गाळ, जलपर्णी काढून त्याची खोली वाढवल्यास तो तारक होईल. पण कर्नाटक सरकार, बेळगाव जिल्हा संबंधित अधिकारी, आमदार साहेबांना याबद्दल निवेदन तसेच प्रत्यक्ष भेटून कल्पना देऊनही नाला स्वच्छ न …
Read More »कन्नड चित्रपट अभिनेते शिवरंजन यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले!
बेळगाव : बैलहोंगल शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, कन्नड चित्रपट अभिनेते शिवरंजन बोळण्णावर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करूनन पळ काढला. मात्र बोळण्णावर किंवा इतर कोणालाही कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची माहिती उपलब्ध आहे. गोळीबार करणाऱ्यांपैकी एक त्याच्या भावाचा नातेवाईक असल्याची माहिती आहे. बैलहोंगल येथील मारूती देवळाजवळील शिवरंजन यांच्या जुन्या घराजवळ हा …
Read More »मदत, बचावकार्यासाठी निधीची कमतरता नाही
मुख्यमंत्री बोम्मई, निगम व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बदलणार बंगळूर : राज्यातील अनेक भाग पुराच्या तडाख्यात असताना या संकटाच्या वेळी कर्नाटक सरकार लोकांच्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सांगितले. मदत आणि बचावकार्यासाठी निधीची कमतरता नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राज्यातील निगम व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बदलून नवीन लोकांना संधी देण्यात येणार …
Read More »लक्ष्मीताई फाउंडेशनतर्फे पॉवरमनना रेनकोट वितरण
बेळगाव : पावसाळ्याच्या दिवसात पॉवरमनकडून मिळणारी सेवा हि अत्यंत महत्वपूर्ण असते. जीव धोक्यात घालून जनतेला सेवा पुरविणाऱ्या पॉवरमनसाठी लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने रेनकोटचे वितरण करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील सुलगा येथील लावण्य हॉल येथे आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात बेळगावच्या केईबी विभागातील पॉवरमनना विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याहस्ते रेनकोट वितरित करण्यात आले. यासंदर्भात …
Read More »आरपीडी महाविद्यालयात २० रोजी राष्ट्रीय हिंदी चर्चासत्र
बेळगाव : ‘आजादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा यांच्या सहकार्याने राणी पार्वती देवी महाविद्यालय, बेळगाव तसेच कर्नाटक राज्य विश्वविद्यालय कॉलेज हिंदी प्राध्यापक संघ बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्य में राष्ट्रीयता की भावना” या विषयावर एकदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. २० जुलै रोजी आरपीडी महाविद्यालयाच्या …
Read More »म. ए. समितीच्या मागणीची राष्ट्रपती कार्यालयाकडून दखल
बेळगाव : भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार सीमाभागातील मराठी भाषिकांना सरकारी परिपत्रके मराठीतून मिळावीत या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने 1 जून रोजी निवेदनाद्वारे जिल्ह्यधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली होती. तसेच 20 दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी भाषिकांनाचा भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आला होता आणि या मागणीची एक …
Read More »पिरनवाडी येथे उद्या “बांदल सेना शौर्य दिवस”
बेळगाव : पिरनवाडी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 13 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता या भागातील समस्त शिवभक्तांतर्फे “पावनखिंडचा रणसंग्राम” अर्थात “बांदल सेना शौर्य दिवस” मानवंदना देऊन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे. पावनखिंडीतल्या रणसंग्रामात अतुलनीय शौर्य गाजविलेल्या पराक्रमी वीर शिवा काशिद आणि बाजीप्रभूंना आम्ही आठवण करतो, पण त्याच रणसंग्रामात अतुलनीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta