बेळगाव : गणेशपुर-सरस्वती नगर येथील श्री. रविंद्र कृष्णाजी मोहिते यांचे कोणत्याही शासकीय अथवा न्यायालयीन आदेशाविना बुल्डोझरने घर पाडण्यात आले, तसे पाहता त्या घराबाबत उच्च न्यायालयाने श्री. रविंद्र कृष्णाजी मोहिते यांच्या बाजुने निर्णय दिला आहे. तरी सुद्धा 60 फुट रस्ता निर्मितीसाठी घर पाडण्यात आले असे सांगण्यात आले. रस्ता व्हावा अशी आमची सुद्धा भुमिका आहे पण कायद्याच्या चौकटीत व्हावे. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्तींना नुकसान भरपाई द्यावी व ती विवादीत जागा रस्त्यासाठी घ्यावी त्याला मोहिते कुटुंब तयार आहेत, पण फक्त घेणे माहीत आहे, देणे माहीत नाही अशा आमदार कुटुंबाला जनताच त्यांची जागा दाखवुन दिल्याशिवाय राहणार नाही, असे धनंजय जाधव म्हणाले.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, एमएलसी चन्नराज हट्टीहोळी, आमदारांचा मुलगा आदी गुंडाना बरोबर घेऊन मोहिते कुटुंबांना धमकी देणे मारहाण करणे, असे प्रकार करत आहेत. हा प्रकार अतिशय निंदनीय व निषेधार्थ आहे. बाहेरुन येऊन तुम्ही बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील जनतेवर अन्याय अत्याचार करत असेल तर याद राखा, हे कदापी सहन करणार नाही. माजलेल्या आमदार व त्यांच्या बंधुंना ह्या अरेरावीची किंमत मोजवी लागेल असेही शेवटी धनंजय जाधव म्हणाले.
Check Also
विद्या प्रसारक शिक्षण मंडळाच्या 55 व्या वर्षपूर्ती निमित्त शोभायात्रेचे आयोजन; प्रसिद्ध गायिका बेला शेंडे प्रमुख आकर्षण
Spread the love बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करीत असलेल्या एसपीएम …