Friday , November 6 2026
Breaking News

शैक्षणिक संस्थात हिजाब बंदी योग्यच : कर्नाटक उच्च न्यायालय

Spread the love

बेंगळुर : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. हिजाबवरून झालेल्या वादानंतर याबद्दल याचिका दाखल करण्यात आली होती. एका महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारल्यानंतर वाद निर्माण झाला होता. हिजाब हा मुस्लिम धर्मात अनिवार्य नसल्याचंही न्यायालायने म्हटलं आहे.
कर्नाटकात शाळा आणि महाविद्यालयात हिजाबवरून वाद निर्माण झाल्यानतंर या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. शाळा, महाविद्यालयात हिजाब बंदीविरोधात अनेक याचिका दाखल केल्या होत्या. या प्रकऱणी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी, न्यायाधीश कृष्णा दीक्षित आणि न्यायाधीश जेएम खाजी यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. सध्या राज्य सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यातील शाळा, कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बस तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी; अंतिम निर्णय परिवहन विभागाकडे

Spread the love  बेळगाव : महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडत चालले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *