Saturday , August 15 2026
Breaking News

गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं : कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल

Spread the love

नवी दिल्ली : गांधी घराण्याने पद सोडावे आणि दुसर्‍या नेत्याला संधी द्यावी. पक्षाला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे माहीत नसतील तर कल्पनेत जगणे सोडावं, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वावर हल्लाबोल केला.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची (उथउ) रविवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी आपली बाजू भूमिका स्पष्ट केली. काहींनी पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला तर काहींनी याला विरोधही केला. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी थेट पक्षनेतृत्वावर निशाणा साधला.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवामुळे मला काही आश्चर्य वाटलेले नाही; पण पक्षाने विचार करावा की, काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बाहेरही काँग्रेस आहे. त्यांनी इतर नेत्यांचं म्हणणंही ऐकून घेण्याची गरज आहे. पक्षाचं नेतृत्व हे फार संकुचित विचार करत आहे, त्यांना मागील आठ वर्षांमध्ये पक्षाची पडझड का होतेय, याची कारणं ठाऊकच नाहीत. तसेच घर की काँग्रेस, असे न म्हणता, काँग्रेसच घर म्हणण्याची वेळ आता आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर; पेपरफुटीप्रकरणी कडक शिक्षेची तरतूद

Spread the love  नवी दिल्ली : नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *