बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज मंगळवारी सकाळी ७ वाजता बेळगावसह राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये प्रारंभ झाला असून दुपारी १ वाजेपर्यंत बेळगाव लोकसभा मतदारसंघात ४०.७८ तर चिक्कोडी मतदारसंघात ४५.६९ मतदान झाले. बेळगाव जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज सकाळी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला. विश्वेश्वरय्यानगर येथील …
Read More »LOCAL NEWS
राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या मतदान
२२७ उमेदवारांचे ठरणार राजकीय भवितव्य; २.५९ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क बंगळूर : चुरसीने होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या (ता. ७) राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मुक्त आणि निष्पक्ष मतदानासाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी केली असून मतदान केंद्रांसमोर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व १४ मतदारसंघातील …
Read More »“त्या” बँकेचा जनरल मॅनेजर सुद्धा विकृत मनोवृत्तीचा!
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने “त्या” तथाकथित बँकेच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे वाचली. आत्ता आणखीन एक किळसवाणा प्रकार सध्या चर्चिला जात आहे. मुळात बेकायदेशीरपणे निवड केलेला हा जनरल मॅनेजर अध्यक्षांच्या नात्यातला आहे. आणि या नात्यातील माणसाला नोकरी बहाल करण्यासाठी त्यांनी आधीच्या मॅनेजरला त्रास देवून राजीनामा देण्यास भाग पाडले. अध्यक्ष आणि या …
Read More »फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे गोशाळेला पशुखाद्याचे वितरण
बेळगाव : बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आज शिवापूर येथील मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामी मठाच्या गोशाळेला पशुखाद्याचे वितरण करण्यात आले. अतिउष्णतेमुळे जनावरांसाठी पाणी आणि अन्नाची टंचाई निर्माण झाली असून कूपनलिका आणि विहिरींच्या पाण्यानेही तळ गाठला आहे. अशावेळी मूक जनावरांच्या पाण्याचा आणि अन्नाचा तुटवडा भासत असून या पार्श्वभूमीवर बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स …
Read More »मतदानासाठी ४ हजार ५२४ मतदान केंद्रे सज्ज
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची ईव्हीएम मशीन व साधनसामग्री वितरण केंद्राला भेट बेळगाव : कर्नाटक राज्यातील उत्तर कर्नाटकातील १४ जिल्ह्यात उद्या मंगळवारी मतदान होत आहे. यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत बेळगाव व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दि. ७ मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या …
Read More »पायोनियर बँकेतर्फे बुधवारी ज्येष्ठ सभासदांचा गौरव
बेळगाव : 118 वर्षाची परंपरा असलेल्या येथील पायोनियर अर्बन बँकेच्या सभासदांचा गौरव समारंभ बुधवार दि. 8 मे रोजी संपन्न होत आहे. बँकेच्या ज्या सभासदांचे वय 75 वर्षे झाले आहे आणि ज्यांनी बँकेकडे आपली नावे नोंदवली आहेत अशा सुमारे 80 सभासदांना या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. कलमठ रोड येथील बँकेच्या …
Read More »रेवण्णा यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी
रेवण्णांना आणखी एक धक्का बंगळूर : प्रज्वल रेवण्णा यांचे अश्लील व्हिडिओ प्रकरण एच. डी. रेवण्णा यांच्या कुटुंबासाठी असह्य वेदना बनले आहे. रेवण्णा यांना अटक केल्यानंतर आज न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. रेवण्णाच्या वकिलाच्या युक्तिवादाला मान्यता मिळाली नाही. पुढील तपासासाठी न्यायाधीशांनी रेवण्णा यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे रेवण्णा यांना …
Read More »सागर बी. एड. महाविद्यालयातर्फे शहरात मतदान जनजागृतीपर प्रभातफेरी
बेळगाव : सागर शिक्षण महाविद्यालयाच्यावतीने (बी. एड.) नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य राजू हळब यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी चौकात प्रभातफेरीचे उदघाटन कऱण्यात आले. त्यानंतर किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाझार, शनिवार खुट मार्गे कित्तूर चन्नम्मा चौकात सागर बी.एडच्या प्रशिक्षणार्थींनी फेरीचा समारोप केला. …
Read More »प्रज्वल रेवण्णा विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी; गृहमंत्री परमेश्वर यांची माहिती
बंगळूर : हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा अश्लील व्हिडिओ प्रकरणात आणखी अडचणीत आले आहेत, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीच्या विनंतीनंतर सीबीआयने प्रज्वलविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली, लैंगिक छळ आणि अपहरणाचा आरोप असलेल्या प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडलचा शोध घेण्यासाठी …
Read More »मोदी सरकारने देशातील प्रत्येकाची फसवणूक केली : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
बेळगाव : दहा वर्षांपूर्वी देशातील जनतेला विविध आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशातील प्रत्येकाची फसवणूक केली आहे. जाती धर्माच्या नावावर देशात तेढ निर्माण करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशाचे संविधान बदलण्याचा घाट मोदी सरकारने घातला आहे. यावेळची लोकसभा निवडणूक स्वातंत्र संग्रामाची दुसरी वेळ ठरली आहे. यासाठी लोकसभेच्या …
Read More »