Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

प्रेयसीसोबत लॉजवर वेळ घालवत असलेल्या पतीला पत्नीने भररस्त्यात चोपले

  बेळगाव : चिकोडी शहरातील बस स्थानकाजवळील एका लॉजमध्ये प्रेयसीसोबत वेळ घालवत असलेल्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले आणि भररस्त्यात चप्पलने चोपवल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश भोसले नावाचा विवाहित पुरुष आपल्या प्रेयसीसोबत लॉजमध्ये आला होता. याची माहिती पत्नीला मिळताच तिने थेट लॉज गाठले आणि त्याला पकडले. संतापलेल्या पत्नीने पतीच्या कॉलरला …

Read More »

डी वाय चौगुले भरतेश हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे ज्युडो स्पर्धेत यश

बेळगाव : येथील भरतेश एज्युकेशन ट्रस्ट संचलित डी वाय चौगुले भरतेश हायस्कूल येथील विद्यार्थिनी कुमारी अंजली पाटील हिने 70+ वजन गटात प्रथम क्रमांक घेऊन ज्यूडो स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. तसेच दुसरी विद्यार्थीनी कुमारी नेत्रा पत्रावळी हिने दुसरा क्रमांक -40 या वजन गटात घेऊन रौप्य पथक पटकाविलेले आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा …

Read More »

राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून समिती नेत्यांना पोलीस प्रशासनाकडून नोटीस

  बेळगाव : सीमाभागात मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार नेहमीच दडपशाही करत असते. बेळगावातील मराठी भाषिक संविधानाच्या माध्यमातून आपला लढा देत असतात परंतु कर्नाटक प्रशासन वेगवेगळ्या तऱ्हेने सीमा लढा मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असते. येत्या 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पुन्हा एकदा कर्नाटक प्रशासनाने दडपशाही करण्यास …

Read More »

लाच मागितल्याप्रकरणी अभियंता लोकायुक्तांच्या जाळ्यात

  बेळगाव : पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा भरपाईचा धनादेश देण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शहर पाणीपुरवठा आणि सांडपाणी महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना लोकायुक्तांनी ताब्यात घेतले. रायबाग तालुक्यातील खेमलापूर गावातील यासिन पेंधारी यांच्या १४ गुंठे जमिनीचे मुगळखोड आणि हारुगेरी शहरांसाठी ‘अमृत’ योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा योजनेसाठी जमीन …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची उद्या बैठक

  बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक उद्या बुधवार दि.29/10/2025 रोजी सायंकाळी ठीक 7.00 वा. विभाग म. ए. समितीच्या कार्यालयात बालशिवाजी वाचनालय येथे होणार आहे. 1 नोव्हेंबर काळा दिन यासाठी बैठक होणार आहे. तरी या बैठकीला आजी माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्राम पंचायत, तसेच नेते व …

Read More »

कोणत्याही परिस्थितीत “काळ्या दिनी” फेरी काढण्याचा शहर समितीच्या बैठकीत निर्धार

  बेळगाव : प्रशासनाने परवानगी नाकारली किंवा अटक झाली तरी एक नोव्हेंबर “काळ्या दिनी” फेरी काढण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे महत्त्वपूर्ण बैठक रंगुबाई पॅलेस येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे होते. …

Read More »

जय किसान भाजी मार्केटच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

  बेळगाव : जय किसान भाजी मार्केटला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने जोरदार दणका दिला असून जय किसान भाजी मार्केटच्या दाखल करण्यात आलेल्या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत. बेळगाव सरकारी कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी भाजी मार्केट) आणि जय किसान खाजगी भाजीपाला मार्केट यांच्यात मागील काही महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. …

Read More »

शामराव नाना पाटील यांचे मरणोत्तर नेत्रदान

  बेळगाव : मुळचे येळ्ळूर येथील आणि भाग्यनगर ९ वा क्रॉस येथील रहिवासी शामराव नाना पाटील यांचे पहाटे ३:१५ वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. निधनानंतर लागलीच त्यांच्या कुटुंबीयांनी जायंट्स आय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मदन बामणे यांच्याशी संपर्क साधून नेत्रदानाविषयी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार केएलई नेत्रपेढीच्या डॉ बाळेश मऱ्याप्पगोळ …

Read More »

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये इन्फंट्री डे साजरा

  बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे इन्फंट्री डे चे आयोजन करण्यात आले होते. मातृभूमीचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना शरकत वॉर मेमोरियल येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे इन्फंट्री डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला लष्कराचे अधिकारी, जवान आणि सेवानिवृत्त …

Read More »

अंमली पदार्थाचे सेवन प्रकरणी ८ जण अटकेत

  बेळगाव : बेळगाव शहर आणि ग्रामीण परिसरात पोलिसांनी अमली पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी असहाय्य वर्तन करणाऱ्या व्यक्तींविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. रविवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर एनडीपीएस कायद्याच्या कलम २७ (बी) अंतर्गत …

Read More »