बेळगाव : कर्नाटक राज्योत्सव दिनानिमित्त 1 नोव्हेंबर रोजी शहरात मिरवणूक काढली जाते. या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेकडून शहरातील विविध गल्ल्यांमध्ये लावण्यात आलेल्या भगव्या पताका काढल्या जात आहेत. दिवाळीनिमित्त खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, काकतीवेस आदी ठिकाणी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत भगव्या पताका लावल्या होत्या. मात्र, राज्योत्सव मिरवणुकीचे कारण पुढे करत मिरवणूक …
Read More »LOCAL NEWS
कवि संमेलन के सर्जनशीलता जिवंत ठेवण्याचे सुंदर माध्यम : प्रा. विवेक दिवटे
बेळगाव : येथील लिंगराज कला आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय आणि लिंगराज पदवी पूर्व महाविद्यालयाच्या हिंदी विभाग आणि प्रेमचंद क्लबच्या संयुक्त विद्यमानाने वतीने कवि संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव येथील सुप्रसिद्ध कवी आणि यरगट्टी येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय हिंदी विभागाचे प्राध्यापक श्री. विवेक दिवटे लाभले. …
Read More »म. ए. युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या
बेळगाव : १ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले …
Read More »“शौर्यवीर रन २०२५” स्पर्धेत बेळगावात धावले शेकडो धावपटू!
बेळगाव : मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे रविवारी “शौर्यवीर रन २०२५”चे आयोजन करण्यात आले होते. ७९ व्या इन्फंट्री डे निमित्त शौर्यवीर रनचा प्रारंभ शिवाजी स्टेडियम येथून झाला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांनी ध्वज दाखवून रनचा प्रारंभ केला. तीन विभागात घेतल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये बेळगाव …
Read More »‘काळा दिना’च्या निषेध फेरीमध्ये सीमा समन्वयक मंत्र्यांना बेळगावात पाठवा; म. ए. समितीतर्फे पत्राद्वारे मागणी
बेळगाव : एक नोव्हेंबर रोजी ‘काळा दिना’च्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या निषेध फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमासमन्वयक मंत्र्यांना बेळगावात पाठविण्यात यावे, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. भाषावर प्रांतरचना करताना सीमाभागातील ८६५ गावांतील मराठी भाषकांवर झालेल्या अन्यायाविरोधात समितीतर्फे १९५६ पासून एक …
Read More »बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई व खजिनदार विनिता बाडगी उपस्थित होते. सेक्रेटरी सुरेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे प्रबोधिनीच्या व्याकरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व द. रा. किल्लेकर स्मृती हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा मराठी विद्यानिकेतन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सदस्य व मच्छे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. …
Read More »कार – दुचाकीच्या भीषण अपघातात अथणीत दोघांचा जागीच मृत्यू
अथणी : अथणी तालुक्यातील सत्ती गावाच्या परिसरात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सत्ती गावाबाहेर दुचाकी आणि समोरून येणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोराची होती की …
Read More »महिला विकास निगमच्या अध्यक्षा पद्मावतींकडून सौंदत्तीत वाणिज्य संकुलाची पाहणी
बेळगाव :;महिला विकास निगमच्या अध्यक्षा पद्मावती यांनी शुक्रवारी सौंदत्ती येथील यल्लम्मा टेकडीला भेट देऊन, निगमच्या वतीने बांधण्यात आलेल्या वाणिज्य संकुलातील गाळ्यांची पाहणी केली. गाळ्यांच्या वाटपाबद्दल त्यांनी देवस्थान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याच वेळी त्यांनी उद्योजिनी योजनेच्या लाभार्थ्यांच्या युनिट्सला भेट देऊन डी.आर.पी. सर्वेक्षणाची पाहणी केली. त्यानंतर, त्यांनी माजी देवदासी महिलांशी …
Read More »“भगवा” ध्वज फडकविल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल
बेळगाव : बेळगाव महानगरपालिका कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या कन्नड ध्वजावरून निर्माण झालेल्या वादाच्या प्रकरणात, कोनेवाडी येथे भगवा ध्वज फडकवून दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. २१ जानेवारी २०२१ रोजी, बेळगाव महानगरपालिकेच्या मुख्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta