Monday , September 21 2026
Breaking News

कार – दुचाकीच्या भीषण अपघातात अथणीत दोघांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

अथणी : अथणी तालुक्यातील सत्ती गावाच्या परिसरात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सत्ती गावाबाहेर दुचाकी आणि समोरून येणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोराची होती की दुचाकीवरील दोघे तरुण घटनास्थळीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अथणी पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *