Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई व खजिनदार विनिता बाडगी उपस्थित होते.
सेक्रेटरी सुरेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी के. एल. मजूकर यांनी दक्षिण भारतातील नद्यांची माहिती व त्यांचे महत्त्व सांगितले तर अशोक लोकूर यांनी योगाभ्यासाबद्दल माहिती दिली.
यावेळी रविंद्रनाथ जुवळी, योगिनी देसाई, सदाशिव व गिरिजा कुलकर्णी, विजय बांदिवडेकर, श्रेयांश चौगुले, गुरुनाथ शिंदे, विजयमाला पाटील, अश्विनी पाटील यांनी मराठी, हिंदी गाणी सादर केली. सुरेन्द्र देसाई यांनी स्वागत केले तर विजय वाईगडे यांनी आभार मानले.
सभासदांनी केलेल्या आग्रहामुळे यापुढे दर महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम होईल याची सभासदांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *