Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

बेळगावमध्ये तीन ठिकाणी लोकायुक्त छापे

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील तीन ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक छापे टाकले आहेत. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज पहाटे बागलकोट, गदग, ​​हावेरी जिल्ह्यांमध्ये छापे टाकून तपासणी केल्यानंतर, बेळगावमध्येही छापे टाकण्यात आले. बेळगाव येथील देवराज अरस विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सिद्धलिंगप्पा यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले. बेळगाव येथील कार्यालय, बेळगाव विद्यानगर …

Read More »

यंग बेळगाव फाउंडेशनची कार्यतत्परता; मनोरुग्णास दिला मदतीचा हात…

    बेळगाव : बेळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील रस्त्याच्या मधोमध गंभीर जखमी आणि अर्ध नग्नावस्थेत पडलेल्या एका मनोरुग्ण इसमाच्या मदतीला धावून जाताना सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना आज घडली. शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील रस्त्याच्या मधोमध …

Read More »

राजहंसगड परिसरात भात पेरणीला सुरवात….

  बेळगाव : मागील आठ दहा दिवसापासून ठाण मांडून बसलेल्या पावसाने थोडी उसंत घेतल्याने राजहंसगड परिसरात पेरणी हंगामाला सुरुवात झाली आहे. भात तसेच भुईमूग शेंगा व सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे.. वळीवाने दडी मारल्याने येथील शेकऱ्यांना पुरेशी मशागत करता आली नाही, अशातच मागील आठवडा भरापासून सतत सुरू झालेल्या पावसामुळे …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये आज शाळेचा प्रारंभोत्सव कार्यक्रम

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रारंभोत्सव झाला. बालवाडीच्या विद्यार्थ्यांचा इयत्ता पहिलीत प्रवेश कार्यक्रम पडला. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांना बॅचेस देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सहाय्यक शिक्षिका नम्रता पाटील यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. जोरदार टाळ्यांच्या गजरात …

Read More »

हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; बेळगाव तालुका समितीचे आवाहन

  बेळगाव : १ जून १९८६ साली झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी रविवार दिनांक १ जून रोजी सकाळी ठीक ८.३० वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या कार्यकर्त्यांनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या …

Read More »

पहिल्या बीडीसीए अखिल भारतीय 1800 खालील फिडे रेटेड क्लासिकल चेस टूर्नामेंट स्पर्धेचे उद्घाटन थाटात

  बेळगाव : बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना (बीडीसीए) आयोजित पहिल्या बीडीसीए अखिल भारतीय 1800 खालील फिडे रेटेड क्लासिकल चेस टूर्नामेंट स्पर्धेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. ऑल इंडिया चेस फेडरेशन आणि कर्नाटक स्टेट चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने ही बुद्धिबळ स्पर्धा शिवबसव नगर, बेळगाव येथील केपीटीसीएल समुदाय भवनात आयोजित करण्यात आली आहे. …

Read More »

लक्ष्मीकांत कांबळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

  कन्येच्या वाढदिवसानिमित्त होतकरू विद्यार्थिनीला शैक्षणिक मदत बेळगाव : बेळगाव येथील लक्ष्मीकांत कांबळे यांनी मुलगी कृतिका हिचा पाचवा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. वाढदिवसासाठी करण्यात येणारा खर्च टाळून माधुरी जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील पंडित नेहरू पी. यु. कॉलेजची विद्यार्थिनी यशोदा कणबरकर हिची एक वर्षाची कॉलेज फी भरून सहकार्य केले. याबद्दल …

Read More »

कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीच्या सुरवातीला ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, माजी महापौर निलिमा चव्हाण, दिपाली दीपक दळवी, कॉ. कृष्णा मेणसे तसेच इतर समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले, …

Read More »

सदाशिवनगर येथे शॉर्टसर्किटमुळे बेकरीला आग; ७५ लाखांचे नुकसान

  अग्निशमन दलाकडून प्रतिसाद न मिळाल्याने बेकरी मालक नाराज बेळगाव : बेळगाव येथील रविवार पेठ कांदा मार्केटमध्ये आज पहाटेच्या सुमारास एका नॉव्हेल्टी शॉपला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच सदाशिवनगर येथील विजय बेकरीमध्येही शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले. बेळगाव सदाशिवनगर सेकंड क्रॉसजनजीक असलेल्या विजय बेकरीत …

Read More »

बेळगावच्या कांदा मार्केटमध्ये भीषण आग; तीन दुकाने जळून खाक

  बेळगाव : आज सकाळी बेळगाव येथील रविवार पेठ कांदा मार्केटमध्ये एका नॉव्हेल्टी शॉपला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत आजूबाजूची तीन दुकानेही जळून खाक झाली. सुरुवातीला एका नॉव्हेल्टी दुकानाला आग लागली. नंतर एका प्लास्टिक आणि एका कपड्यांच्या दुकानाला आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात सामान …

Read More »