Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगावच्या कांदा मार्केटमध्ये भीषण आग; तीन दुकाने जळून खाक

Spread the love

 

बेळगाव : आज सकाळी बेळगाव येथील रविवार पेठ कांदा मार्केटमध्ये एका नॉव्हेल्टी शॉपला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत आजूबाजूची तीन दुकानेही जळून खाक झाली.

सुरुवातीला एका नॉव्हेल्टी दुकानाला आग लागली. नंतर एका प्लास्टिक आणि एका कपड्यांच्या दुकानाला आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली.

कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *