Sunday , June 7 2026
Breaking News

वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक

Spread the love

 

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या आहेत, त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. समोर आलेल्या माहितीनुसार निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाच्या जवळचा व्यक्ती आहे. त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे.

वैष्णवीचे बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होते, वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे, त्यानंतर देखील त्याची काही प्रकरण समोर आली होती, त्यानंतर तो फरार झाला होता, त्याच्याविरोधात स्टँडिंग वारंट देखील काढण्यात आले होते. सुरुवातील पोलिसांच्या तीन पथकांकडून निलेश चव्हाण याचा शोध घेण्यात येत होता, त्यानंतर पोलिसांची पथकं वाढवण्यात आली, सहा पोलिसांच्या पथकाकडू निलेश चव्हाणचा शोध सुरू होता, अखेर आज त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळमध्ये जाऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेली वैष्णवीची सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना गुरुवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे. तर दुसरीकडे वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि सासरा राजेंद्र हगवणे हे पोलीस कोठडीत आहेत. बुधवारी न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत 31 मे पर्यंत वाढ केली.

About Belgaum Varta

Check Also

भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये एसआयटी समोर नोंदवला जबाब

Spread the love  नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रूपाली चाकणकर यांची नाशिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *