बेळगाव : महिला दिनी त्यांचा कर्तृत्वाचा सन्मान करून त्यांना बळकटी देण्याचे काम जायंट्स मेन या संस्थेने केले आहे असे विचार समाजसेवक परशराम घाडी यांनी व्यक्त केले. जायंट्स मेन या सेवाभावी संघटनेच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, प्रमुख पाहुणे …
Read More »LOCAL NEWS
जागतिक महिला दिनीच खानापूर सरकारी दवाखान्यात बाळंतीण महिलेकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न
माजी आमदार डॉ. निंबाळकर यांनी धरले तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर.. खानापूर : सरकारने कोटींचा निधी खर्च करून खानापुरात बांधलेल्या सरकारी दवाखान्यात रुग्णांकडून चक्क 7000 हजारांची मागणी डॉक्टरांनी केल्याची तक्रार मा. आ. डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या कार्यालयात रुग्णांकडून करण्यात आली आहे. लागलीच ही माहिती आ. निंबाळकर यांच्या कानी पडताच त्यांनी …
Read More »कडोलीत सोमवारी महिला दिन
कडोली : येथील मराठी साहित्य संघ, महिला विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि कस्तुरबा महिला मंडळ यांच्यातर्फे सोमवार दि. 10 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी 5-30 वाजता साहित्य संघाच्या कार्यालयासमोर हा कार्यक्रम होईल. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून संजीवनी फौंडेशनच्या संचालक डॉ. सुरेखा पोटे …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ‘पाखरांनो घ्या उंच भरारी’ या प्रेरणा गीताने केली. यासाठी संगीत शिक्षण सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांच्या साथीने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळा …
Read More »नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीचे अपहरण? मुस्लीम तरुणाविरोधात संताप
बेळगाव : नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीचे अपहरण एका मुस्लिम तरुणाने केल्याचा गंभीर आरोप संबंधित तरुणीच्या कुटुंबियांनी केला असल्याचे समजते. सदर तरुणाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावात ही घटना घडली आहे. 17 दिवसांपूर्वी सदरुद्दीनने एका हिंदू मुलीचे अपहरण केले होते. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या …
Read More »ज्ञानमंदिर शाळेत नारीशक्ती सन्मान सोहळा संपन्न
बेळगाव (प्रतिनिधी) : शास्त्रीनगर येथील दि. आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञानमंदिर इंग्रजी शाळेत महिला दिनाच्या निमित्ताने नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नारीशक्ती सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्यासह नगरसेवक राजू भातकांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप …
Read More »नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथे जागतिक महिला दिन संपन्न
येळ्ळूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथील सभागृहात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.रूपा अरविंदराव पाटील व सौ. रूपा राजशेखर होसुरकर(कामती) यांच्या शुभ हस्ते व सौ. शोभना रामचंद्र नंद्याळकर, सौ. नेहा अक्षय पाटील, …
Read More »कर्नाटकच्या हम्पी येथे इस्रायल महिलेसह दोघींवर बलात्कार, परदेशी पर्यटकांना मारहाण; एकाचा मृत्यू
हम्पी : कर्नाटकातील हम्पी येथे इस्रायलच्या २७ वर्षीय आणि भारतातील होम स्टे मालक असलेल्या २९ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. गुरूवारी रात्री हा गुन्हा घडला. यावेळी या महिलांसह तीन पुरूष पर्यटकही उपस्थित होते. यापैकी एका पुरूष पर्यटकाचा मृतदेह पोलिसांना तलावात आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी …
Read More »सोगल येथे सोमवारपासून सोमनाथ यात्रा महोत्सव
बेळगाव : श्रीक्षेत्र सोगल (ता बैलहोंगल) येथील सोमेश्वर यात्रा महोत्सव साजरा होणार आहे. रविवार दिनांक ९ ते मंगळवार दिनांक ११ तारखेपर्यंत सोमेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून रुद्राभिषेक,दुपारी महाप्रसाद, सायंकाळी सात पासून शिव भजन शिव कीर्तन आधी कार्यक्रम होणार आहेत. सोमवारी सकाळी …
Read More »चार लाख कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर
१९ हजार कोटींची महसुली तूट; विकासकेंद्रित अर्थसंकल्पाचा दावा, हमी योजनासाठी ५१ हजार कोटीची तरतूद बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या, ज्यांच्याकडे अर्थखाते देखील आहे, त्यांनी शुक्रवारी २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला, ज्यामध्ये हमी योजनांसाठी तब्बल ५१,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यांनी डझनभर नवीन घोषणा देखील केल्या. आज विधानसभेत ४,०९,५४९ कोटी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta