Sunday , July 26 2026
Breaking News

जायंट्स मेनच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा; सहा कर्तबगार महिलांचा केला सन्मान

Spread the love

 

 

बेळगाव : महिला दिनी त्यांचा कर्तृत्वाचा सन्मान करून त्यांना बळकटी देण्याचे काम जायंट्स मेन या संस्थेने केले आहे असे विचार समाजसेवक परशराम घाडी यांनी व्यक्त केले.
जायंट्स मेन या सेवाभावी संघटनेच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, प्रमुख पाहुणे परशराम घाडी, विभागीय संचालक शिवकुमार हिरेमठ, फेडरेशन संचालक संजय पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून झाली.
त्यानंतर आजच्या दिवसाचे औचित्य साधून कुटुंब सांभाळून सामाजिक कार्यात सुद्धा सहभागी असणाऱ्या काकती ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौ. वर्षा लक्ष्मण मुचंडीकर, संसाररुपी गाड्याला आर्थिक सहकार्य करण्यासाठी घराबाहेर पडून एक प्रामाणिक कर्मचारी म्हणून गेली दहा वर्षे महिला आघाडी या हॉटेलमध्ये कार्यरत असणाऱ्या सौ. राजश्री बांबुळकर, अगदी लहान वयापासून कुस्तीपटू म्हणून नावारूपाला येत गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या अनेक पुरस्काराच्या मानकरी आणि सध्या जिल्हा युवजन खात्यामध्ये कुस्ती प्रशिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या एकलव्य पुरस्कारप्राप्त कु.स्मिता बी पाटील, माजी तालुका पंचायत सदस्या आणि सांवगाव परिसरातील सतत क्रियाशील असणाऱ्या समाजसेविका निरा काकतकर उच्चविद्याविभूषित असणाऱ्या महिला सौहार्द क्रेडिट सोसायटीच्या सीईओ तन्वी समीर वेलंगी त्याच सोसायटीच्या शाखा व्यवस्थापक सौ. प्रेरणा गोपीनाथ महागावकर या सहा कर्तृत्ववान महिलांचा शाल स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मधू बेळगावकर, अजित कोकणे, प्रदीप चव्हाण, पुंडलिक पावशे, मुकुंद महागावकर, राहुल बेळवलकर यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला.

त्यानंतर सत्कारमूर्ती महिलांनी कृतज्ञतापूर्वक विचार व्यक्त केले.
शेवटी अध्यक्षीय समारोप करताना यल्लाप्पा पाटील यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमास बहुसंख्येने जायंट्स मेनचे पदाधिकारी सदस्य आणि सत्कारमूर्तीच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव मुकुंद महागावकर यांनी तर आभार अजित कोकणे यांनी मांडले.
कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन मधील कै. तात्या पवार सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *