Monday , September 21 2026
Breaking News

कडोलीत सोमवारी महिला दिन

Spread the love

 

कडोली : येथील मराठी साहित्य संघ, महिला विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि कस्तुरबा महिला मंडळ यांच्यातर्फे सोमवार दि. 10 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी 5-30 वाजता साहित्य संघाच्या कार्यालयासमोर हा कार्यक्रम होईल.

यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून संजीवनी फौंडेशनच्या संचालक डॉ. सुरेखा पोटे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून राष्ट्रीय महिला खो -खो संघाच्या प्रशिक्षक, निवड समिती सदस्य आणि टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या ए. एस. आय. वंदना पाटील -शिंदे आणि पाहुण्या म्हणून संगीता धुडुम उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला महिला मंडळे, युवती मंडळे, गावातील सर्व महिलांनी उपस्थित राहावे असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *