बेळगाव : यश कम्युनिकेशन्स व यश इव्हेंट्सच्या वतीने मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात शॉपिंग उत्सव या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी अनेक मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. चेंबर ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, लघु उद्योग भारतीच्या अध्यक्षा वंदना पुराणिक, खुला बाॅक्सचे संचालक रईस खान, यश आॕटोचे संचालक संजय मोरे, …
Read More »LOCAL NEWS
बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना आयोजित कुस्ती मैदान बुधवारी
बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने यंदा आनंदवाडी येथील आखाड्यात बुधवार 12 मार्च रोजी कुस्तीचे मैदान भरणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामुळे सदर मैदान बुधवार दि. 12 रोजी भरवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. बेळगाव शहर परिसरातील कुस्ती प्रेक्षक आणि क्रिकेट प्रेक्षकांची कुचंबणा टाळण्यासाठी जिल्हा कुस्तीगीर संघटनेने …
Read More »रोटरी वेणुग्रामतर्फे महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार
बेळगाव : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावच्यावतीने आयोजित कर्तव्यदक्ष महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. सदर समारंभास क्लबचे अध्यक्ष रो. विनयकुमार बाळीकाई, सचिव रो. लतेश पोरवाल, व्यावसायिक सेवा संचालक रो. सोमनाथ कुडचिकर, आरसीवी क्लबच्या अध्यक्षा शीला शशिकांत पाटील आणि स्वाती राहुल अंबेवाडी …
Read More »शांताई विद्या आधारला भरतेश संस्थेकडून मदत
बेळगाव : जुनी पुस्तके आणि वर्तमानपत्रे (रद्दी) विकून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यास समर्पित असलेल्या शांताई विद्या आधार या उपक्रमाला भरतेश संस्थांकडून पुन्हा एकदा पाठिंबा मिळाला असून सामाजिक कार्यांप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेचे पालन करत भरतेशने विद्या आधारकडे रद्दीचा मुबलक संग्रह सुपूर्द केला. कार्यक्रमाप्रसंगी भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे सचिव विनोद एस. …
Read More »बारावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत असंख्य चुका असल्याने विद्यार्थ्यांना ग्रेस गुण द्यावेत : युवा समितीच्या वतीने निवेदन
बेळगाव : बारावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत असंख्य चुका असल्याने विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात यावेत यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पदवीपूर्व जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच मधु बंगारप्पा शिक्षणमंत्री कर्नाटक राज्य यांना सुद्धा सदर निवेदनाची प्रत पाठविण्यात आली. खालीलप्रमाणे निवेदन देण्यात आले. मंगळवार दिनांक ४/३/२०२५ रोजी …
Read More »रुद्र जिमचा महेश गवळी ‘मि. रॉ क्लासिक’ किताबाचा मानकरी
बेळगाव : रॉ फिटनेसच्यावतीने बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग अँड स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित मिस्टर क्लासिक जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेच्या विजेतेपदासह ‘मि. रॉ क्लासिक’ हा मानाचा किताब रुद्र जिमच्या महेश गवळी याने पटकावला आहे स्पर्धेतील ‘उत्कृष्ट पोझर’ किताबाचा मानकरी गोकाकचा सागर कळ्ळीमनी हा ठरला. भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे …
Read More »आशादीपतर्फे दुर्गम भागातील पाच शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
येळ्ळूर : येळ्ळूर गावचे सुपुत्र, आशादीप वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष व अभियंते हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी यांच्याकडून खानापूर दुर्गम भागातील असोगा, नेरसा, चाफा वाडा, हणबरवाडा व कोंगळा (नदीतून वाट काढून) येथील 200 हुन अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना अभियंते हणमंत कुगजी म्हणाले, शिक्षित …
Read More »बेळगाव बीम्समध्ये आणखी एका बाळंतीण महिलेचा मृत्यू
बेळगाव : बेळगावच्या बीम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. तुम्मरगुद्दी गावातील बनांती नामक महिलेची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे तीला गेल्या तीन दिवसांपासून अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तथापि दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता तिचा मृत्यू झाला असून एपीएमसी पोलिस ठाण्यात …
Read More »हुतात्म्याचे वारसदार शट्टूपा चव्हाण यांचे निधन
बेळगाव : बेळगुंदी येथील रहिवासी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर कार्यकर्ते शट्टूपा भावकू चव्हाण (वय ४०) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी सकाळी 11 वाजता बेळगुंदी येथे होणार आहे. 1986 सालच्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात बळी …
Read More »बहुप्रतिक्षित राज्य अर्थसंकल्प उद्या होणार सादर
सिद्धरामय्यांचे गणित काय असेल? याची उत्सुकता बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या (ता. ७) आपला विक्रमी अर्थसंकल्प सादर करत आहेत, ज्यामध्ये मूलभूत पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी कार्यक्रमांच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार, ते पाच हमी योजना सुरू ठेवतील आणि अधिक लोककल्याणकारी योजनांचा समावेश करतील, अशी अपेक्षा आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta